आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी पंचायत समिती गंगाखेड येथे घेतली आढावा बैठक
पं. स.प्रमुख अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना धरले धारेवर.
जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी
दिनांक २९ जून रोजी गंगाखेड पंचायत समिती येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्षलागवड सार्वजनिक विहीर व इतर विषयावर महत्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी पंचायत समिती प्रांगणात आ डॉ रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या वडिलांचे काहिदीवस पूर्वी निधन झाल्याने त्यांची आठवण म्हणून एक झाड लावले. या बैठकी मध्ये प्रामुख्याने रोजगार हमी योजने अंतर्गत वृक्ष लागवड सार्वजनिक विहीर पांदण रस्ते व जलसंधारण मध्ये वृक्ष लागवड इत्यादी विषयी तालुक्यातील सर्व सरपंचांना आपापल्या ग्रामपंचायतीमध्ये ठराव घेऊन अशा प्रकारचा प्रस्ताव पंचायत समिती मध्ये दाखल करावे व आपल्या गावातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा व त्या प्रस्तावास BDO यांनी तात्काळ मंजुरी देऊन कामे मार्गी लावावे , तसेच सार्वजनिक विहिरी व वैयक्तिक विहिरीला,पांदण रस्ते आणि वृक्षलगवडीच्या प्रस्तावास मंजुरी देऊन लोकांची कामे करावीत अशा सूचना बीडिओ व तहसीलदारांना आमदार साहेबांनी दिल्या. तालुक्यातील नवीन-जुन्या सरपंच याना गावातील विकास कामे कशी करावीत त्या साठी काय केले पाहिजे याचे योग्य मार्गदर्शन यावेळी केले व तालुक्यातील सर्व ग्रामसेवक,तलाठी यांची प्रत्येक महिन्याला बैठक बोलावली जाईल व कामाचा आढावा घेतला जाईल असेही ठरविण्यात आले. यावेळी तहसीलदार स्वरूप कंका ळ साहेब यांनी सुद्धा सरपंच याना त्यांच्या कामात पूर्ण सहकार्य केले जाईल व सर्व माहिती दिली जाईल असे सांगितले. तसेच BDO अंकुश चव्हाण साहेब यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्षलागवड सार्वजनिक विहीर व पांदण रस्ते यासाठी पूर्णतः सहकार्य केले जाईल व इतरही विकास कामाबाबत योग्य त्या प्रस्तावास मंजुरी दिली जाईल असे स्पष्ट केले. यावेळी आ डॉ रत्नाकर गुट्टे,तहसीलदार स्वरूप कंकाळ,गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य किसनराव भोसले,राजेश फड, प्रल्हादराव मुरकुटे,भगवान सानप, विधानसभा अध्यक्ष कृष्णा सोळंके,पंचायत समितीचे सभापती मुजाराम मुंडे पंचायत समिती उपसभापती माधवराव शेंडगे,पंचायत समिती सदस्य लक्ष्मण आप्पा मुंडे,मगर पोले, नितीन बडे, गंगाधर कांबळे,सरपंच संघटना तालुका अध्यक्ष शिवाजी पवार ग्रामसेवक प्रतिनिधी सरपंच प्रतिनिधी तालुक्यातील सर्व गावचे सरपंच मोठ्या संख्येने उपस्तीत होते.