आरेंदा आणि ताडगुडा येथे अतिक्रण शेत जमिनीची मोजनीला सुरूवात
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
अहेरी तालुका व आरेंदा ग्रामपंचायत अंतर्गत येणारे मौजा – आरेंदा आणि ताडगुडा या दोन गावात, सण २००५ पुर्वी अतिक्राण केलेले शेतकऱ्यांचे शेत जमिनीची मोजणीला सुरू करण्यात आले आहे.
यामध्ये मौजा – आरेंदा गावाचे ३१ शेतकरी व ताडगुडा गावाचे २३ अतिक्राण शेतकरी आहेत.
महत्त्वाचे म्हणजे अहेरी विधानसभा क्षेत्रात सण २००५ पुर्वी अतिक्रण केलेले सर्व शेतकऱ्यांचे शेत जमिनीची मोजणी करण्यासाठी म्हणून अहेरी विधान सभेचे लोकप्रिय आमदार श्री धर्माराव बाबा आत्राम साहेब व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.भाग्यश्री ताई आत्राम ( हलगेकर ) यांनी शासस्तरावर पाटपुरवठा करून, अतिक्रमण शेत जमिन मोजणी करीता लागणारे आदेश हे सर्व विभागाकडून कढण्यात आले. व त्यानंतर अतिक्रण शेतकऱ्यांचा शेत जमिनीची मोजणीला प्रत्येक्षात सुरू झालेला आहे.
त्यामुळे आता अतिक्राण शेतकऱ्यांचा चेहऱ्यावर आनंद दिसुन येत आहे.
यावेळी मौजा – आरेंदा आणि ताडगुडा या दोन गावाचा अतीक्राण शेत जमीन मोजणी करतांना येरमनार माजी सरपंच श्री बालाजी गावडे, आरेंदा चे वनरक्षक श्री आर.के.सांगळे, ताडगुडा चे वनरक्षक श्री अविनाश कोडापे, ताडगुडा चे वन हक्क अध्यक्ष श्री डोलू गावडे,सचिव श्री राजु आत्राम, वन विभागाचे चौकीदार श्री कारू आत्राम आणि मौजा- आरेंदा, ताडगुडा गावातील शेतकरी उपस्थित होते.