प्रशांत डवले यांचे नेतृत्वात प्रभाग क्र.4 न्यू प्रगती कॉलनी चिमूर येथील समस्सेबाबत महिला मंडळ यांचे कडून नगर परिषदला निवेदन सादर

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक 4 न्यू प्रगती कॉलनी चिमूर येथे कायमस्वरूपी वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असल्याने रोज येत असलेल्या पावसाने व कॉलोनी मध्ये पक्के नाली बांधकाम न झाल्यामुळे कॉलनीतील खाली प्लॉटमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी पाण्याची 3 ते 4 फुटापर्यंत साठवणूक होत असते. साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे मच्छरांची पैदास होऊन त्या ठिकाणी साप, विंचू, किडे तसेच बऱ्यास जीवनास घातक असणाऱ्या जिवाणूंची निर्मिती होत असून कॉलनीतील नागरिकांना साथीच्या रोगांना समोर जाण्यास टाळता येत नाही. त्यामुळे साथीचे रोग पसरून जीवित हानी होण्याची पण शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणें कळत-नकळत साचलेल्या पाण्याजवळ लहान मुले खेळण्यासाठी जात असतात त्या पाण्याची साठवणूक 3 ते 4 फुटांपर्यंत खोलवर झाल्याने त्यामध्ये लहान मुलांची बुडून जीवितहानी सुद्धा होणे टाळता येत नाही.
तसेच कॉलनीतील सिमेंट काँक्रीट रोड ला मोठे-मोठे खड्डे पडले असून त्यामुळे जाण्या-येण्यासाठी रोज त्रास होत असतो.
यासंदर्भात कॉलनीतील नागरिकांनी 1 जून 2022 ला नगरपरिषदला निवेदन देऊन संबंधित समस्यांवर उपाययोजना व्हाव्यात यासाठी विनंतीपूर्वक कळविले होते. परंतु आज दीड महिण्याचे पलीकडे कालावधी होऊन सुद्धा संबंधित समस्यांवर काहीच उपयोजना झालेल्या नसल्याने कॉलोनीतील महिलांनी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष श्री. प्रशांतभाऊ डवले यांना हाक दिली व आपल्या समस्या त्यांना पुरेपुर समजावून सांगून त्यावर लवकरात-लवकर उपाययोजना व्हावी यासाठी विनंती केली असता जराही विलंब न लावता महिलांच्या विनंतीला मान देऊन त्याच कॉलनीतील महिलांसोबत डवले यांनी नगरपरिषद कार्यालय गाठले व नगरपरिषद अधीक्षक मार्फत मुख्याधिकारी यांचे सोबत समस्यांबाबत चर्चा करून संबंधित समस्यांवर लवकरात-लवकर उपाययोजना करून नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घ्यावी, अन्यथा न्यू प्रेरणा कॉलनीतील सर्व रहिवाशी नागरिकांना सोबत घेऊन युवक काँग्रेस चिमूरच्या माध्यमातून ठिय्या आंदोलन घेण्यात येईल असा इशारा डवले यांचे कडून निवेदनाद्वारे नगरपरिषद प्रशासनाला देण्यात आला.
यावेळी निवेदन देतांना माजी. सरपंच शंकरपूर सौ. दिक्षाताई भगत, सौ. सुषमा नन्नावर, सौ.विद्या सहारे, सौ. मंजुषा केळझरकर, सौ. नलू नन्नावर, सौ. कविता मसराम, सौ. मीनाक्षी चरपे, सौ. अर्चना शेंडे आदी महिला मंडळी उपस्थित होत्या.