मानवत येथे आमदार सुरेश वरपूडकर यांचा हस्ते बांधकाम कामगारांना गृह उपयोगी संचाचे वाटप

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत शहरातील अहिल्याबाई होळकर सभागृह येथे पाथरी विधानसभा चे आमदार सुरेश वरपूडकर यांचा हस्ते 200 बांधकाम कामगारांना गृह उपयोगी संचाचे वाटप दि. 22 जुलै सोमवार रोजी करण्यात आले.
या संचामध्ये एकूण 30 ग्रह उपयोगी भांडी लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.
इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नविन बांधकाम जेथे सुरु होते तेथे स्थलांतरीत व्हावे लागते. अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास, पाल्यांचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जुळवुन घ्यावे लागते. त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वितरण करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यावेळी जिल्हा कामगार अधिकारी मानगावकर साहेब, सय्यद जमील, शेख परवेज, अकबर अन्सारी, इलियास पठाण, श्रीकांत देशमुख, महेश कोकर, आनंद मामा भदर्गे, दीपक बारहाते, श्याम चव्हाण, बाबा कच्छवे, रहीम भाई, अनिल जाधव, बाबाजी अवचार, महेश कोक्कर, अफसर अंसारी, अनंता मामा भदर्गे, अफसर फौजी, अनील जाधव, सतीश भाई बारहाते, अंजुम अन्सारी, मुजम्मील कुरेशी, विक्रम सिंग दहे, ऋषिकेश बारहाते, शिवनारायण सारडा, खय्युम सहारा, सय्यद आरेफ, अलीम अंसारी,रशिद मिर्झा, यांच्यासह कांग्रेस पक्षाचे पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठि नागरिक, नगर सेवक, व बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.