नागभीड येथे फोटोग्रॉफी कार्यशाळा संपन्न
मुख्य संपादक : कु. समिधा भैसारे
छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर तसेच नागभीड तालुका छायाचित्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रुख्मिणी सभागृह, नागभीड येथे रविवार ८ नोव्हेंबरला शिका, संघटीत व्हा हा विचार घेवून ना नफा, ना तोटा या तत्वावर जिल्हास्तरीय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिध्द मेंटर नितीन मेश्रामकर यांनी उपस्थित छायाचित्रकारांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत वेडिंग फोटोग्रॉफी, हायस्पिड सिन्क्रो, स्पिडलाईट फोटोग्रॉफी, पर्सनल कॅमेरा सेटिंग, मॉडेलसह प्रॅक्टिकल फोटो, व्यवसायासमंधित प्रश्नोत्तरे यासारखे अनेक विषय हाताळले असून जिल्ह्यातील छायाचित्रकारांच्या प्रश्नांना मेश्रामकर यांनी उत्तरे दिली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था चंद्रपूरचे अध्यक्ष नितीन रायपुरे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून नितीन मेश्रामकर हे होते. प्रमुख पाहुणे फुलचंद मेश्राम, रविंद्र भगत, संस्थेचे विधी सल्लागार अॅड खुशाल खोब्रागडे, कवी भट, महेंद्र लोखंडे, ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष आनंद ठाकरे, संयोजक केशिप पाटील, सिदेवाही तालुका अध्यक्ष दिनेश गोवर्धन, कोअर कमेटी सदस्य मदन नैताम, माऊली फोटो बुक आल्बम नागपुरचे पंकज, बॉम्बे कॅमेरा शापीचे संचालक हरीश उमरेडकर, नागभीड तालुका छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष मंगेश फुकट, उपाध्यक्ष रविंद्र शेंडे, सचिव पपील देशमुख, उमरेड तालुका छायाचित्रकार संघटनेचे समर भगत उपस्थित होते.जिल्हाभरातून या कार्यक्रमास ऑनलाईन तसेच ऑफलाईन नोंदणी करण्यात आली होती. कार्यशाळेत फोटो अल्बमचा स्टाॅल व प्रथमच सर्व प्रकारच्या कंपनीचे डिजिटल फोटो कॅमेरे तसेच डिजिटल व्हिडिओ कॅमेरे बॉम्बे कॅमेरा शॉपीने खरेदी केले असून फोटोग्राफीसाठी लागणारे सर्व प्रकारचे वस्तू विक्रीसाठी ऊपलब्ध करण्यात आले होते. यावेळी छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्थेच्या सभासदांसाठी जिल्हास्तरीय छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यात प्रथम पुरस्कार गोंडपिपरी तालुक्यातील अरुण कुत्तरमारे, द्वितीय पुरस्कार नागभीड तालुक्यातील देवा बावनकर तर तृतीय पुरस्कार मुल तालुक्यातील रुपेश कोठारे यांनी पटकाविला. छायाचित्र स्पर्धा विजेत्यास मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. छायाचित्र स्पर्धेचे परिक्षण योगेश पेंटावार, भारत सलाम यांनी केले.कार्यशाळेचे प्रास्ताविक फूलचंद मेश्राम, संचालन सतीश डांगे तर आभार संजय बांबोळे यांनी मानले. यावेळी छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्थेचे सर्व तालुका तसेच जिल्हा कार्यकारीणी सदस्य छायाचित्रकार मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगेश आगलावे, राहुल पाथोडे, रोशन तरारे, ज्ञानेश्वर डांगे, संजय अमृतकर, नरेश मांडवकर, विलास शास्त्रकार, प्रदीप मडावी, विजय निकुरे, महेश नागोसे, सुभाष उरकुडे, अश्विन बांगरे, रामदास वाघाडे, राजू कोटांगले, झामदेव बोरकर, निरंजन शास्त्रकर, विलास जेंगठे, देवेंद्र डोंगरवार, प्रेम डोंगरवार यांनी अथक परिश्रम घेतले