महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी तर्फे श्री साईबाबा जन्मस्थानला विशेष डिस्काउंट मध्ये बोलेरो निवो जीप देण्यात आली
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
प.पू. श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर, श्री साई स्मारक समिती, पाथरी जि.परभणी (ट्रस्ट रजि.नं.इ-४३ परभणीला) महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी तर्फे बोलेरो जीप विशेष डिस्काउंट मध्ये देण्यात आली. दि. 21 जानेवारी 2024 रोजी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे “सीनियर व्हाईस प्रेसिडेंट (ऑपरेशन) मा. श्री विनयजी खानोलकर साहेब आणि महिंद्रा अँड महिंद्रा चाकण प्लांटचे व्हॉइस प्रेसिडेंट (मॅन्युफॅक्चरिंग युनिट) मा. श्री श्रीकांतजी दुबे साहेब यांच्या शुभहस्ते जीपची पूजा करण्यात आली. या प्रसंगी मा श्री सूर्यभान सांगडे कोषाध्यक्ष विश्वस्त, मा.अॅड. श्री अतुल दि. चौधरी व्यवस्थापकीय विश्वस्त, मा. श्री संजय भुसारी विश्वस्त, मा. श्री एन के कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी, सौ छाया कुलकर्णी मंदिर अधीक्षिका तसेच सौ दिना खानोलकर मॅडम, सौ नीलिमा भुसारी आणि मंदिर सेवेकरी व साईभक्त उपस्थित होते. श्रीकांतजी दुबे यांचा यथोचित आदर सत्कार मा.व्यवस्थापकीय विश्वस्त अॅड. श्री. अतुल दि. चौधरी व मा.विश्वस्त श्री.संजय प्र. भुसारी याचे शुभ हस्ते करण्यात आला. मा.व्यवस्थापन मंडळच्या वतीने श्री.संजय भुसारी विश्वस्त यांनी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी व श्री विनय जी खानोलकर साहेब आणि श्री श्रीकांतजी दुबे साहेबांचे आभार मानले.