ताज्या घडामोडी
स्व. नितीन महाविद्यालयात विज्ञान दिन साजरा

जिल्हा प्रतिनीधी:अहमद अन्सारी परभणी
स्व. नितीन महाविद्यालय पाथरी येथे 28 फेब्रुवारी रोजी विज्ञान शाखेच्या वतीने विज्ञान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राम फुन्ने सर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ हरी काळे यांनी केले. तसेच विद्यार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले. विज्ञान दिनानिमित्त वनस्पतीशास्त्र विभागाचा वतीने पोस्टर प्रदर्शन चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा मानोलिकर हिने केले तर आभार प्रदर्शन श्रद्धा गरड हिने केले. कार्यक्रमासाठी डॉ बोचरे सर, डॉ इजेगावकर सर, डॉ मोरे सर, डॉ ठोंबरे सर, डॉ शीतल गायकवाड, डॉ रंजित गायके, डॉ रुपाली बाबरे, डॉ मंजुषा सोनुले, प्रा अरुण विरकर, प्रा रुतुजा पवार, डॉ त्रिशाला खरात याची उपस्थिती होती.