ताज्या घडामोडी

पोलीस मित्र परिवार समन्वय समितीने म.ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रम राबवुन केली साजरी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दि.१४/४/२०२२ : *पोलीस मित्र परिवार समन्वय समिती परभणी जिल्हातील पाथरी माळीवाडा येथे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ.संघपाल उमरे यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्य मुख्य सल्लागार मा.सुभाष दादा सोळंके महाराष्ट्र,सचिव विनोद पत्रे,महाराष्ट्र राज्य महिला प्रमुख मा.माधुरीताई गुजराथी यांच्या आदेशावरुन मराठवाडा महिला विभाग अध्यक्षा मा.सौ.रेखाताई मनेरे,मा. मराठवाडा अध्यक्ष मा.अहेमद अन्सारी,व इतर सर्व वरीष्ठांच्या नेतृत्वाखाली “महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांच्या सयुंक्त जयंती निमित्त रांगोळी स्पर्धा व संगीत खुर्ची या खेळाचे आयोजन करण्यात आले.यासाठी परिसरातील मुली,महिला व बचत गटाच्या सर्व महिलांनी या स्पर्धे मध्ये अपला सहभाग नोंदवाला रांगोळी व संगीत खुर्ची या स्पर्धे मधिल पहिला,दुसरा आणि तिसरा क्रमांकास पोलीस मित्र परिवार समन्यवय समितीच्या मराठवाडा महिला विभाग प्रमुख मा.सौ.रेखाताई मनेरे यांच्या हस्ते व या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मा.सौ.अमरताई विठ्ठल विरकर, कार्यक्रमाचे उदघाटक श्री. मा. हरिशचंद्र वाघमारे सर व कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे मा.सौ.विमलताई चिंचाणे कांन्तीजोती सावित्रीबाई फुले महिला नागरी पतसंस्थेच्या अध्यक्ष,श्री.मुरलीधर चिंचाणे यांच्या उपस्थितीत बक्षिस वितरण करण्यात आले.सर्व प्रथम सर्व पाहुण्यांनी महात्मा फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्प हार अर्पण केले.याप्रसंगी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतिने सौ.रेखाताई मनेरे यांचे शाल,पुष्पगुच्छ, व नारळ देऊन सन्मानित करण्यात आले.व समिती करीत असलेल्या कार्याचे गुणगान गायिले व पुढिल वाटचालीस सुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शुभम विरकर,निखिल चिंचाणे सौ.सुमनबाई साळवे,सौ.पुजा सोगे,सौ.रेणुका कांबळे,सौ.रुक्मिणी कचरूबा गालफाडे,सौ.मोनीका संदिप चांदणे,सौ.चंद्रकला गालफाडे,सौ.उषा हनुमान कांबळे,सौ.मुक्ताबाई नामदेव डोगंरे,सौ.लताबाई साळवे,सौ.रेणुका सावळे सौ.शिला गायकवाड,सौ.सुशिलाबाई मनेरे व पोलीस मिञ परिवार समन्वय समितीच्या सर्व महिला पदधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शविली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close