ताज्या घडामोडी

पात्रुड येथे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाकडुन दंड

शहर प्रतिनिधी :अलिम इनामदार पात्रुड

कोरोना विषाणूच्या वाढत्या अति प्रादूर्भावामुळे राज्य शासनाने लागू केलेल्या ३ दिवस कडक लॉकडाउन मध्ये पात्रुड येथे रस्त्यावर विना कारण फिरू नये,
आणि कोणत्याही अत्यावश्यक कामा-शिवाय घराबाहेर पडू नये म्हणून ,
पात्रुड ग्रामपंचायत आणि पोलिस प्रशासना मार्फत कडक कारवाई करण्यात येत आहे,‌आणि विना परवाना वाहन चालकांना दंड देण्यात आला.यामध्ये माजलगाव ग्रामीण पोलिस स्टेशन च्या ए.पी.आय. पुंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ,
ए.एस.आय. आईटवार ,
पोलिस नाईक ढोबळे ,
पो.कॉ.रफिक निन्सुरवाले
आणि पूर्ण टीम उपस्थित होती.पाञुडचे ग्रामसेवक गायकवाड यांच्या सर्व ग्रामपंचायत टीम सोबत विना कारण फिरणार्यांना दंड ठोठावण्यात आला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close