ताज्या घडामोडी
छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मराठा क्रांती मोर्चा शिवजन्मोत्सव समिती सर्व शिवप्रेमी च्या वतीने महानगरपालिका आयुक्त मॅडम यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या होत असलेल्या निकृष्ट कामाबद्दल तक्रार करण्यात आली आहे. या कामाच्या फुटींग मध्ये ठिसूळ दगडे भरण्यात आली आहेत.पूर्ण काम हे डस्ट मध्ये करण्यात येत आहे वाळूचा वापर कुठेही करण्यात येत नाही
या पूर्ण कामाची क्वालिटीची पाहणी मनपा आयुक्त मॅडम यांनी तात्काळ करावी व 19 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण काम करण्यात यावे अशी मागणी आज करण्यात आली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक किशोर रनेर, संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष नितीन देशमुख, महानगर अध्यक्ष गजानन जोगदंड, जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते, राजू शिंदे, प्रीतम पैठने, यांच्या निवेदनावर सह्या आहेत