चिमुर वरोरा महामार्ग अपघातास देत आहे आमंत्रण

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
चिमुर ते वरोरा राष्ट्रीय महामार्गाचे काम ५वर्षापासुन सुरू असून ते काम आत्ता पर्यंत पुर्ण झाले नाही.
मुरपार येथिल wcl कर्मचारी आपली ड्युटी संपवुन आपल्या घरी परत जात असतांना चिमुर वरोरा महामार्गावरून चिमुर इथुन ३ किमी अतंरावर असलेल्या शेडेगाव जवळwcl ची गाडी क्र. एम एच ४0 बि एल ४२५६ स्लिप होऊन रोडच्या खाली उतरली व तिथेच फसली गेली व म्हणुन मोठी जिवीत हाणी टळली त्या गाडीमध्ये तीस च्या वर wcl चे कर्मचारी होते. या राष्ट्रीय महामार्गावर सबंधीतांच्या दुर्लक्षित कारभारा मुळे मोठ्या अपघाताची शक्यता आहे त्या रोड ला लागुन असलेल्या नाल्यांची अवस्था खुपच वाईट झालेली आहे. संबंधीत विभाग व कंत्राटदार यांच्या ढिसाळ नियोजनामुळे महामार्गावरील गावातील नागरीकांच्या मनात भितीचे वातावर निर्माण झाले आहे.
लवकरात लवकर या रोडचे काम पुर्ण करण्यात यावे अशी मागणी रोड लगत असणाऱ्या गावकऱ्यांकडून होत आहे.