नागभीड येथे शिक्षक भारतीची सहविचार सभा
तालुका कार्यकारिणी गठीत
नागभीड प्रतिनिधीः आनंद विस्तारी मेश्राम
मो.9923420085
” शिक्षणाच्या हक्कासाठी, शिक्षकांच्या सन्मानासाठी” या ब्रीदवाक्यासह कुठल्याही राजकीय पक्षाच्या अधिपत्याखाली न येता स्वतंत्र पणे आपली भूमिका मांडणारी शासनमान्य संघटना म्हणजे “शिक्षक भारती.” शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी अल्पावधित या शिक्षक संघटनेला सर्वोच्च ठिकाणी नेऊन ठेवले आहे…!!
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2022-23 करिता शाळा तिथे संघटना या हेतूने आज दिनांक 17 आक्टोबर रोजी जनता विद्यालय नागभीड सहविचार सभेचे आयोजन केले होते… या सभेला अध्यक्ष म्हणून जनता कन्या तथा कनिष्ठ महाविद्यालायचे प्राचार्य मेहर सर होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.राजेंद्र झाडे राज्य उपाध्यक्ष शिक्षक भारती हे होते.. तर प्रमुख अतिथी म्हणून मा.भाऊरावजी पत्रे विभागीय अध्यक्ष नागपुर विभाग शिक्षक भारती,प्रा.संजयजी खेडीकर राज्य संयुक्त कार्यवाह शिक्षक भारती,भास्करजी बावनकर जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती,सुरेशजी डांगे विभागीय सरचिटणीस शिक्षक भारती ,सोनवाणे मॅडम महिला विभागीय संघटिका शिक्षक भारती,चक्रधर रोहनकर सर जिल्हा उपाध्यक्ष शिक्षक भारती ,काटेखाये सर मार्गदर्शक शिक्षक भारती यांची उपस्थिती होती..!महाराष्ट्रातला ‘शिक्षक’ हा दुहेरी कैचीत सापडला असून अनुदानित शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचे धोरण सरकार राबवित आहे.पगारदार शिक्षकावर घरी बसण्याची वेळ आली आहे.. संचमान्यता घोळात अनेक शिक्षक अतिरिक्त ठरणार.त्यांच्या पगाराचे व नौकरीचे काय? खाजगी स्वयंअर्थसहाय्यीत शाळांचे पेव फुटले आहे.गरिबांचा मध्यमवर्गीय,बहुजनांचा शिक्षण हक्क नाकारण्याचीच पूर्वतयारी सरकारने केली आहे… अशी सर्व परिस्थिती पाहता या विरुद्ध लढण्यासाठी आपली संघटना मजबूत करने,शाळा वाचविणे,सरकारच्या धोरणांचा विरोध करणे यासाठी ‘शिक्षक भारती’ संघटना मजबूत करण्याचे तसेच येणाऱ्या निवडणुकी मध्ये शिक्षक भारतीच्या उमेदवाराला विजयी करावे आवाहन यावेळी मान्यवराकडून करण्यात आले..!!
यावेळी शिक्षक भारती संघटनेची तालुका कार्यकारिणी तयार करण्यात आली… त्यात तालुका अध्यक्ष म्हणून कृष्णाजी देवाडे सर यांची नियुक्ती करण्यात आली तर कार्याध्यक्ष पदी बाळकृष्ण पांडव,उपाध्यक्ष पदी रविंद्र सहारे सर, कार्यवाह पदी पराग भानारकर सर,सहकार्यवाह पदी मंगेश मंदे सर,संघटक पदी रवींद्र जांभूळे सर,आश्रम शाळा जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून प्रा.जिभकाटे सर यांची नियुक्ती करून त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले…!!
यावेळी सतीश जीवतोडे सर,विनोद मेश्राम सर,गजानन मारभते सर, वसंत मसराम सर,निलेश देशकर सर, दिनेश जिभकाटे सर,लेखराम ब्राम्हणकर सर,सुरेश चौधरी सर,जगदीश कोरे सर, विकास मैद सर,वासुदेव सातपैसे सर यांची उपस्थिती होती..!!
या कार्यक्रमाचे संचालन प्रवीण पिसे सर जिल्हाउपाध्यक्ष शिक्षक भारती यांनी केले प्रास्ताविक सुरेश डांगे सर जिल्हा सरचिटणीस शिक्षक भारती यांनी केले तर आभार पराग भानारकर सर यांनी मानले..!!!