चिमुर तहसीलदारांवर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
उपसंपादक :विशाल इन्दोरकर
चिमुर क्षेत्रात नेहमीच रेती तस्करी तसेच अवैध रेती टॅक्टर द्वारे झालेली जिवित हानी चर्चेत आहे . अशातच काग ( सोनेगाव ) येथील रेती घाट संबंधी अवैध लिलाव व रेती घाट चोरीचे आरोप निदर्शन केले गेले .आज दि .१४ एप्रील २०२१ला सारंग दाभेकर चिमुर व कैलास भोयर काग ( सोनेगाव ) यांनी चिमुरचे तहसीलदार श्री संजय नागटीळक काग सोनेगाव च्या तलाठी कु. चिकाटे तसेच अनओळखी ट्रॅक्टर चालक मालक यांच्या विरुद्ध पालीस स्टेशन चिमुर येथे लेखी तक्रार दाखल केली.
तहसीलदार तसेच सबंधीता विरोधात असे आरोप आहेत की काग ( सोनेगाव ) च्या रेतीघाटचे लिलाव अवैध्य तसेच गैरमार्गाने करण्यात आलेले आहे. तसेच उपसा जवळपास ३० लाखांचा माल लंपास केला गेला आहे. हे सर्व तहसीलदार , तलाठी व ट्रॅक्टरवाले यांच्या संगनमताने होत आहे . तक्रारीत असेही नमुद केले गेले की मागील वर्षी सुद्धा पो.नी. धुळे यांच्या सहकार्याने रेती तस्करांच्या माध्यमातुन लाखोची रेती चोरण्यात आली.
करीता तहसीलदार , सबंधीत अधिकारी व संबधीतांवर योग्य ती पोलीस कारवाई करण्यात यावी अशी तक्रारकर्ते सांरग दाभेकर व कैलास भोयर यांची मागणी आहे. पुढील कार्यवाही काय होते याकडे सुज्ञ नागरीकांचे डोळे लागले आहेत .