‘त्या’ उपोषणकर्त्यांची सखाराम बोबडे पडेगावकर यांनी घेतली भेट
जिल्हा प्रतिनिधि:अहमद अन्सारी परभणी
कर्ज मिळतं नसल्याने कंटाळून मध्यवर्ती बँकेच्या समोर उपोषणास बसलेल्या पालम येथील शेतकऱ्यांची परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी मंगळवारी भेट घेत आपला लेखी पाठिंबा जाहीर केला.
पेंडू बुद्रुक येथील पाच शेतकऱ्यांनी मध्यवर्ती बँकेच्या कर्जासाठी विभागीय व्यवस्थापक कार्यालयाकडून सर्व कागदपत्र कार्यवाही पूर्ण करून आणले . पण पालम शाखेतील कर्ज विभागाचे अधिकारी कर्ज मंजूर करत नव्हते .शेवटी कंटाळून सोमवारी रोजी त्यांनी उपोषण सुरू केले या उपोषणकर्त्यां च्या मागणीला पाठिंबा म्हणून परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पडेगावकऱ्यांनी मंगळवारी उपोषणकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी माजी सरपंच जयदेव मिसे ,ग्राहक पंचायतचे सचिव मुंजाभाऊ लांडे, दत्तराज घोरपडे व उपोषण करते देवीदास भुजगराव पातळे,देवबा महाराज धुंळगडे,विठ्ठल होणाजी पातळे,विठ्ठल माधवराव विमडे,
गोविंद बळीराम पातळे उपस्थित होते.