ताज्या घडामोडी

नांदेडमध्ये संत नामदेव साहित्य संमेलन होणार 4 फेब्रुवारीला दिमाखात

स्वागताध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांची महिती.

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

भक्त शिरोमणी संत नामदेवांच्या ७५४ व्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून ४ फेब्रुवारी २०२४ (रविवार) रोजी नानक साई फाऊंडेशन व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संत नामदेव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ जगदीश कदम यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संत नामदेव महाराज यांची कर्मभुमी पंजाबातील घुमान येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभुमीवर नामदेवांच्या ७५४ व्या जन्मशताब्दीच्या औचित्य साधून साहित्य संमेलनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला होता,त्यास महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळाकडून रीतसर मान्यता दिली आहे. त्यानुसार नांदेड येथे हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे. श्री गुरु गोविंदसिंघजी महाराज यांच्या पावन भूमीत हे संमेलन होत असल्याने या सोहळ्याला ऐतिहासिक महत्व प्राप्त होणार आहे. नानक साई फाऊंडेशन ने संमेलनाचे यजमानपद स्वीकारले असून संमेलनात संत नामदेव महाराज यांचे साहित्य व त्यांची श्री गुरु ग्रंथ साहिब मधील बाणी,विचार याबाबत विचारमंथन,व ,विविध विषयावर परिसंवाद,कथाकथन,कवीसंमेलन,ग्रंथदिंडी,पुरस्कार वितरण आदी कार्यक्रमांची मेजवानी साहित्यप्रेमींना मिळणार आहे. सम्मेलन यशस्वी होण्यासाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत असे बोकारे यांनी सांगितले. संमेलनात राज्यभरातून मोठ्या संखेने साहित्यिक व साहित्य प्रेमी सहभागी होत आहेत. जावळपास २७ जिल्ह्यातील साहित्यिक,साहित्यप्रेमीचा सहभाग राहणार आहे. पानीपत च्या युद्धात शहीद झालेल्या रोड मराठा वीरांच्या वंशजांचा सहभाग सनेलनात राहणार आहे.
संत साहित्य‌ाची आजच्या काळात आवश्यकता आहे का? या विषयावर परिसंवाद होणार असून यात नामवंत वक्ते डॉ संजय जगताप डॉ मार्तंड कुलकर्णी, प्रा संध्या रंगारी प्रकट मत मांडणार आहेत. कथाकथन,कवीसंमेलन,ग्रंथदिंडी आदी कार्यक्रमांची मेजवानी नांदेडकराना मिळणार आहे. घुमानच्या अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनाचे अध्यक्ष डॉ सदानंद मोरे, सासवडच्या अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनाचे अध्यक्ष प्रा.फ.मू.शिंदे, सासवडच्या अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनाचे स्वागत अध्यक्ष अँड विजय भाऊ कोलते,माजी शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य प्रा.प्रदीप पाटील (इस्लामपूrर),दिनेश आवटी (पारनेर),प्रा.धनंजय गुडसूरकर (उदगीर),विलास सिंदगीकर (केकत सिंदगी) यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणुन उपस्थिती राहणार आहे. संमेलनाला नांदेड सह राज्यातील प्रमुख मान्यवर साहित्यिकाना निमंत्रित केले जात आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ जगदीश कदम यांची निवड झाली आहे. संमेलन नांदेड येथील श्री गुरु ग्रंथ साहिब भवन मधे भरविले जाणार आहे. संमेलनाच्या अधिक माहिती साठी मा. पंढरीनाथ बोकरे, मोबा – 9823260073, तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा संस्थापक – सचिव – फॅमिली वेलफेअर रिसर्च अँड ट्रेनिंग सोसायटी, अध्यक्ष – पुरूष हक्क संरक्षण समिती, पुणे. प्रदेश अध्यक्ष – राष्ट्रीय लोक कलाकर मंच ऍड.संतोष शिंदे, मोबा – 7507004606 यावर संपर्क साधावा.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close