निडवणुक प्रक्रीया झालेल्या १२ सोसायट्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात
पाथरी तालुका आमदार बाबाजाणी दुर्राणी यांचे वर्चस्व कायम.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी तालुक्यातील मुदत संपलेल्या २४ विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला.त्यापैकी आत्तापर्यंत निवडणूक प्रक्रिया पुर्ण झालेल्या १२ सोसायट्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत.या ठिकाणी आमदार बाबाजाणी दुर्राणी यांचे वर्चस्व कायम आहे. पाथरी तालुक्यातील २४ गावातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने या सर्व सोसायटी निवडणूक कार्यक्रम सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून घोषित करण्यात आल्या.तालुका स्तरावरील सहकार क्षेत्रातील महत्वपुर्ण असलेली कृषी उत्पन्न बाजार समीती आमदार बाबाजाणी दुर्राणी यांच्या कुशल नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे.या बाजार समीतीच्या उत्तम प्रशासनातून व्यापारी ,शेतकऱ्यांसाठी उत्तम सुविधा,भौतिक सुविधांसह अभिनव प्रकल्पातून या पाथरी बाजार समीतीने मराठवाड्यात नावलौकिक प्राप्त हे एक वैशिष्ट्य आहे .हि बाजार समिती ताब्यात ठेवण्यासाठी तालुक्यातील सोसायट्या आपल्या ताब्यात राहील्या पाहीजे यासाठी आमदार बाबाजाणी दुर्राणी यांनी पुर्णवेळ लक्ष देऊन ग्रामीण भागातील गावच्या सोसायट्या निवडणुकीची रणनिती आखली आणि २४ पैकी आत्तापर्यंत निवडणूक प्रक्रिया झालेल्या १२ सोसायटी वर राष्ट्रवादी ने यश मिळवून आपली पक्कड मजबूत केली आहे. यश मिळविलेल्या सेवा सोसायट्यामध्ये वाघाळा, बाभळगाव, लिंबा, बाणेगाव, वडी, कासापुरी, गुंज, सिमुरगव्हाण, रेणाखळी, नाथरा या १० सोसायट्या राष्ट्रवादी ने बिनविरोध आपले ताब्यात ठेवले तर चुरशीच्या व सर्व तालुक्याचे लक्ष लागलेल्या उमरा व पाथरगव्हाण या सोसायटी च्या मतदान प्रक्रियेतून या दोन्ही ठिकाणी सर्व उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रसे निवडून आले.
आत्ता निवडणूक प्रक्रियेत असणाऱ्या लोणी,झरी, कानसुर, गोपेगाव, जवळा झुटा, विटा, टाकळगव्हाण, तारुगव्हाण, मुदगल, खेर्डा, बांदरवाडा ,पाथरी या १२ सोसायटी वर देखील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल असे मत आ.बाबाजाणी दुर्राणी यांनी व्यक्त केले.
▪️या पुर्वी निवडणूक झालेल्या ९ सोसायटीवर ही राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व..
कोरोना प्रादुर्भाव येण्यापुर्वीच पाथरी तालुक्यात ९ विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांची निवडणूक पार पडल्या होत्या.या सोसायटी वर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे या सोसायटी मध्ये हादगांव बु,रेणापूर,वरखेड,मरडसगांव,चाटे पिंपळगाव,सारोळा बु,डाकु पिंपरी,रामपुरी,पाटोदा गं.की.या गावच्या सोसायटी चा सामावेश आहे.