ताज्या घडामोडी

नक्षलवादी पुन्हा सक्रिय: हेडरीतील इसमाची केली हत्या

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

मागील अनेक दिवसांपासून एटापल्ली तालुक्यात नक्षली कारवाही थंडावली होती. परंतु आता सुरजागड प्रकल्पाचे अनेक मुद्दे समोर येत असताना त्यांच्या हालचालींना सुरूवात झाल्याचे चित्र दिसत आहे.

काल दिनांक १८ सप्टेंबर रोजी हेडरी येथील रहिवासी सोमाजी सडमेक याला त्याच्या राहत्या घरातून नक्षलवादी घेऊन गेले आणि आज सकाळी त्याचा मृतदेह सुरजागड येथील मंदिरासमोरील बोरिंग जवळ आढळून आला आहे. ही हत्या गोळी झाडून करण्यात आली असल्याचे प्रथम दर्शनी लक्षात येत आहे.

हत्येचे कारण सांगणारे कुठल्याही प्रकारचे फलक किंवा पाम्प्लेट मृतदेहाजवळ आढळून न आल्याने ही हत्या पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून करण्यात आली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु अद्याप याबाबत ठोस माहिती पुढे आलेली नाही.

या हत्येनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. इतके दिवस शांत असलेले नक्षलवादी सुरजागड प्रकल्पाच्या मुद्यावरून पुन्हा सक्रीय होत आहेत का? असा प्रश्न सगळीकडे निर्माण होतात दिसत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close