ताज्या घडामोडी

गोगलगाय, पैसा, वानू इत्यादीने उध्वस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या – आ.गुट्टे

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील ज्या शेतकऱ्यांची कोवळी पिके गोगलगाय, पैसा, वाणू इत्यादीने खाऊन उद्ध्वस्त केली आहेत. अशा पिकांची तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अशा आशयाचे पत्र आमदार गुट्टे यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा.ना. दादा भुसे, कृषी सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त औरंगाबाद, जिल्हाधिकारी परभणी, जिल्हा कृषी अधिकारी परभणी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तालुका कृषी अधिकारी गंगाखेड यांना दिले आहे.
खरीप २०२१ हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेल्या सोयाबीन, मूग, उडीद यांच्यासह लागवड केलेल्या कापसावर ही शंखाच्या गोगलगाय, पैसा व वानु ने मोठ्या प्रमाणावर पिकांची पाने कुरतडलेल्या ने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. अगोदरच कोरोना महामारीने परेशान झालेला शेतकरी अतिवृष्टी व या नैसर्गिक आपत्तीने अधिकच परेशान झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळीच सावरणे होणे गरजेचे असल्याचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी या पत्रात म्हटले आहे.
त्यामुळे खरीप हंगाम २०२१ मध्ये पेरलेल्या सोयाबिन, व लागवड केलेल्या कापसासह आदी पिके गोगलगाय, पैसा, वानु आळीने उद्ध्वस्त केली आहेत. त्यांचे पंचनामे करून आपत्ती व्यवस्थापन व पीक विमा परताव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत तात्काळ करावी अशी मागणी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close