पाथरी पोलीस स्टेशन येथे मकरसंक्रांत निमित्ताने हळदी कुंकू समारंभ संपन्न
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 10/02/2024 रोजी पाथरी येथे पोलीस स्टशनमध्ये तीळ गुळ घ्या गोड गोड बोला हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.डाॅ. संघपाल उमरे यांच्या नेतृत्वाखाली व मा.सौ.रेखाताई मनेरे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा,मा.अहेमद अन्सारी, मराठवाडा संघटक, मराठवाडा अध्यक्ष मा.शेख अजहर हादगावकर, जिल्हा सचिव मा.शेख ईफतेखार बेलदार, महिला जिल्हा अध्यक्षा मा.सौ.जयश्री शाम पुंडगे, आणि इतर वरिष्ठ पदधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तिळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला मकरसंक्रांत निमित्ताने हळदी कुंकू समारंभ सर्व पोलीस कर्मचारी यांना तिळ गुळ व महिला पोलीस कर्मचारी यांना भेट वस्तू व तिळ गुळ देऊन पाथरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
हया कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. बालाजी लटपटे,बिट जमादार कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून पोलीस कर्मचारी मा.अशोक धस यांच्या हस्ते करण्यात आले आणि प्रमुख पाहुणे म्हणून महिला पोलीस कर्मचारी मा.सौ.कांबळे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. सोनू जिंकलवाड मॅडम यांनी केले तर सुत्रसंचलन पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा मा.सौ.रेखाताई मनेरे यांनी केले आभार प्रदर्शन महिला पोलीस कर्मचारी मा.प्रिती दुधवडे मॅडम यांनी आभार मानले आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिला पोलीस कर्मचारी मा.प्रिती दुधवडे मॅडम,मा.जिंकलवाड मॅडम ,पोलीस कर्मचारी मा.थोरे साहेब,मा.वंदना निरस मॅडम मा.सौ.रेखा मनेरे, सौ.अंतिका वाघमारे, श्रीमती छाया अंभोरे,मीरा नाईक, व इत्यादी महिला पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले आणि अशा प्रकारे पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉ.संघपाल उमरे यांच्या नेतृत्वाखाली पाथरी पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस कर्मचारी यांनी तिळ गुळ घ्या गोड गोड बोला मकरसंक्रांत निमित्ताने हळदी कुंकू समारंभ हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला