ताज्या घडामोडी

राष्ट्रसंताच्या पुण्यतिथी निमित्त चित्रकला स्पर्धा

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

दिनांक २२/११/२०२२ रोज मंगळवार ला श्री गुरुदेव सेवा मंडळ डोंगरगाव (रेल्वे) द्वारा आयोजित ब्राम्हलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या दिनांक २१ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २ ०२२ अशा ७ दिवशीय ५४ व्या पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्या निमित्ताने शाळकरी मुलामुलींना तरुणांना थोरसंत,महापुरुष यांच्या कार्याचे महत्व पाठवून देण्यासाठी म्हणून विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात आज सकाळी ९:०० ते ११:०० या कालावधीत निशुल्क प्रवेश असलेली चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये थोर संत व महापुरुषांचे चित्र रेखाटने हा या स्पर्धेचा विषय असून, चित्र काढताना बालकांना महापुरुषांची तोंड ओळख व्हावी आणि त्यांच्या कार्य-कर्तृत्वाची जाणीव देखील व्हावी, व बालकांमधील असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने ही स्पर्धा श्री गुरुदेव सेवा मंडळ डोंगरगाव रेल्वे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली होती. या स्पर्धे करीता अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी. चैताली पोटे द्वितीय कु. पूर्वी दुर्गे, तृतीय कु. ट्विनकल भोयर, प्रोत्साहन पर पारितोषिके कु. आरुषी खिरटकर, कुमार. तन्मय काळे , कु. आर्या आपटे, कु. जया बेहरे, कु. स्नेहल आपटे, कुमार . युगांत मारेकर, कु. केतन उरकुंदे आणि कु.गायत्री दरेकर. अशा विद्यार्थ्यांना बक्षिसे प्राप्त झाली. या कार्यक्रमाचे परीक्षक श्री हितेश चंद्रभान घुगल व श्री शुभम शंकर चिकटे हे होते परीक्षकांनी दिलेल्या गुणांच्या आधारे स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close