ताज्या घडामोडी

आय फ्लू ने डोळ्यांची काळजी घ्या : नुमान चाऊस

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे वातावरणात चांगलाच बदल झालेला आहे. दरवर्षी या ऋतूच्या सुरुवातीला तब्येत बिघडणे ही एक सामान्य बाब आहे. परंतु सध्याच्या पावसाळ्यात डोळे येणे म्हणजे “आय फ्लू” ची साथ सुरू आहे. ही साथ सर्वत्र तेजीने पसरत आहे. डोळ्यात टोचल्यासारखे वाटणे, झोपेतून उठल्यावर पापण्या एकमेकांना चिकटून राहणे, डोळे लाल होणे, त्यावर सूज येणे, डोळ्यात खाज, जळजळ होणे ही आय फ्लूची काही लक्षणे आहेत.
आपणास आय फ्लू होऊ नये म्हणून दुसऱ्या व्यक्तींच्या रुमाल, टॉवेल, कपड्याने आपले डोळे पुसू नका, स्वच्छ पाण्याने डोळे सतत धुवत रहा, बाहेर जाताना गाॅगल वापरा, डोळ्यांना सतत स्पर्श करू नका आणि संसर्ग झाल्यावर नेत्रतज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या असे आवाहन मौलाना आझाद युवा मंचचे बीड जिल्हा अध्यक्ष तथा जमियते उलेमा-ए-हिंद चे माजलगाव तालुका उपाध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close