व्यवस्थापन करताना अडथळा आणल्याप्रकरणी नगराध्यक्ष यांच्या वर कारवाई करा: नगर परिषद कर्मचारी संघटना वरोरा चे निवेदन देत काम बंद आंदोलन

कर्मचाऱ्यांकडून काळी फित लावत घटनेचा निषेध.
तालुका प्रतिनिधी: ग्यानीवंत गेडाम वरोरा
काल दिनांक १ मे २०२१ला वरोरा शहरातील गांधी चौक च्या जवळ असलेल्या चाळीत चपलेचे दुकान सुरू असल्याचे कळताच नगर परिषद कर्मचारी सोबत पोलीस कर्मचारी व तहसील कार्यालयाची चमू ने मिळून काही दुकानांना सील करून कारवाई केली .
वरोरा शहरात आपत्ती व्यवस्थापन च्या अंतर्गत दुकानाना कडक लॉकडाऊन चे पालन करण्याचे आदेश असताना देखील शहरातील व्यापारी वर्ग छूप्या मार्गाने दुकाने सुरू ठेवत विक्री सुरूच होती .त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन चमू ने कारवाई केली .चमू ने केलेल्या कारवाई विरोधात नगर परिषद वरोरा चे नगराध्यक्ष अहेतेशाम अली विना मास्क 15 ते 20 जणांसह घटनास्थळी येत चमुला शिवीगाळ करीत सील केलेले दुकाना वरील सील काढले व शासकीय कामात अडथळा आणत नगर परिषदेच्या कामात अडथळा आणल्याने कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची झाल्याचे कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आले.शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्यावर योग्य कारवाई करावी अशी विनंती कर्मचारी संघटनेने निवेदना मार्फत जिल्हाधिकारी यांना केली आहे.जो पर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत काम बंद राहील असेही कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आले आहे.एकीकडे एक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन नगर परिषद कडूनच केल्या जाते .परंतु खुद्द नगर परिषद वरोरा चे नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्या वर काय कारवाई होईल हे विशेष ?
वरोरा नगर परिषद चे मुख्याधिकारी गजानन भोयर यांनी कर्मचाऱ्यांना वेळ मागत यावर तोडगा काढू असे आश्वासन दिल्यानंतर आज दुपारी 4 च्या दरम्यान कर्मचारी व मुख्याधिकारी ,नगर परिषद वरोरा यांच्यात बैठक झाली परंतु बैठकीत कोणताही तोडगा निघू न शकल्याने चर्चा निष्फळ ठरली .