ताज्या घडामोडी

अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. डॉ.कीरणजी लहामटे यांच्या उपस्थितीत रामजन्मोत्सव पार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

अकोले : आज दिनांक १० एप्रील २०२२ रोजी
“एक ही नारा,एक ही नाम”
जय श्रीराम, जय श्रीराम
या जयघोषात अतिशय उत्साहाच्या वातावरणात श्री क्षेत्र राममाळ उंचखडक बुद्रूक येथे श्री रामनवमी (रामजन्मोत्सव) पार पडली,अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय डॉ.कीरणजी लहामटेसाहेब,अकोले पोलिस स्टेशनचे पीआय माननीय श्री.हांडोरेसाहेब,उंचखडक गावचे भुमीपुत्र तसेच पतीत पावन संघाचे महाराष्ट्र राज्याचे प्रांत अध्यक्ष शिवव्याख्याते प्राध्यापक एस.झेड.देशमुखसर, आरपीआय चे महाराष्ट्र राज्याचे नेते श्री. विजयराव वाकचौरे,देवस्थानचे सरचिटणीस योगी केशवबाबा चौधरी,महंत आजच्या रामजन्माचे कीर्तनकार भागवताचार्य ह.भ.प.विठ्ठलपंत गोंडेमहाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत रामजन्मोत्सव पार पडला.माननीय आमदारसाहेब हे या रामजन्मोत्सवासाठी आवर्जुन उपस्थित राहुन श्री क्षेत्र राममाळ देवस्थान येथे कुठल्या सुख सुविधा आहेत तसेच या ठिकाणी काय काय सुख सुविधा पुरवता येतील याची माहीती देवस्थानचे उपाध्यक्ष अशोकराव देशमुख, विश्वस्त प्रतापराव देशमुख, भाऊसाहेब खरात, हिंमतराव मोहीते,सार्वभौमचे संपादक सागर शिंदेसर यांच्याशी चर्चा केली, यावेळी तालुक्यातील देवस्थानवर ज्यांची नितांत श्रध्दा असलेले भाऊसाहेब नाईकवाडीसाहेब,ओंकारेश्वर देवस्थान औरंगपुरचे अध्यक्ष सुनिल वाळुंजसर, शामराव वाळुंज तसेच अकोले तालुक्यातील तमाम श्रीरामभक्त व उंचखडक बुद्रुक ग्रामस्थ तसेच विश्वस्त दिलीपराव मंडलिक,भरतराव देशमुख, देवराम शिंदे उपस्थितीत होते.तसेच गावातील विशेष प्राविण्य मिळवलेले आरटीओ पदी नियुक्ती झालेले मेजर श्रीकांत कुंडलीकराव मंडलिक व अक्षय मधुकर देशमुख यांचा विशेष गुणगौरव करण्यात आला. रामजन्मोत्सवानंतर उंचखडक बुद्रूक सोसायटीचे मा.चेअरमन अशोकराव रं देशमुख यांच्याकडुन जमलेल्या सर्व भक्तांसाठी उपवासानिमीत्त खिचडी व राजेंद्र शिंदे,विजय मंडलिक,राजेंद्र चाफेकर, ग्रामपंचायत सदस्य संजय गावंडे,उद्धव देशमुख,मंगेश खरात,बबलु देशमुख,अंकुश शिंदे आदी मीत्रपरिवाराने फळांचे आयोजन केले होते.आमदारसाहेबांनी देखील उपवास असल्याने खीचडी व फळांचा आनंद घेतला त्याचबरोबर प्राध्यापक एस.झेड.देशमुखसर,अशोकराव देशमुख(अण्णा) यांनी आमदारसाहेबांचा गावातील लहामटे गुरुजींच्या समवयस्कर असलेल्या गावातील जुन्याजानत्या मंडळींशी संवाद घडवुन आणला तेंव्हा साहेबांनी आवर्जुन गावातील जेष्ठ पुंजाबाबा मंडलिक व भाऊसाहेब खरात(मामा) यांच्या तब्बेतीची चौकशी करत कळजी घेण्यास सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उंचखडक बुद्रूक गावचे उपसरपंच तसेच बुवासाहेब नवले मल्टिस्टेटचे संचालक महिपाल देशमुख (बबनराव) यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close