योगेश्वरी शुगर च्या कामगाराचा मुलगा सद्दाम झाला शासकिय अधिकारी;चेअरमन देशमुखां कडून कौतुकाची थाप
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी तालुक्यातील लिंबा येथील योगेश्वरी शुगर्स परिवाराने नेहमीच गुणवंतांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देत त्यांच्या पाठिवर कौतुकाची थाप तर मारलीच प्रसंगी लागेल ती मदत ही देण्यास कधी टाळंटाळ केली नाही.याची प्ररचिती पुन्हा एकवार पहावयास मिळाली असून या साखर कारखाण्यात कामगार असलेले विटा येथील शेख उमर शेख वजीर यांचा मुलगा शेख सद्दाम नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण होऊन पाटबंधारे विभागा मध्ये सहायक अभियंता म्हणून सेलू येथे रुजू झाला. या यशवंताचा गुणगौरव माजलगाव चे माजी आमदार तथा योगेश्वरी शुगर्सचे चेअरमन आर टी देशमुख जिजा यांच्या हस्ते शनिवारी साखर कारखाना कार्यालयात करण्यात आला.
या वेळी कार्यकारी संचालक अॅड रोहित आर देशमुख,शेख उमर शेख वजीर आणि अधिकारी यांची उपस्थिती होती.योगेश्वरी शुगर कारखान्यातील कर्मचारी शेख ओमर शेख वजीर राहणार विटा तालुका पाथरी येथील असून त्यांचा मुलगा शेख सद्दाम यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग निवड समितीमार्फत पाटबंधारे विभागामध्ये सहाय्यक अभियंता श्रेणी २ मध्ये निवड झाली आहे. नुकतीच त्यांना पाटबंधारे विभाग सेलू येथे नियुक्ती मिळाली आहे. या त्यांच्या यशाबद्दल कारखान्याचे चेअरमन तथा माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आर. टी .देशमुख जिजा यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. शेख उमर यांनी खूप कष्ट करून मुलांना शहराच्या ठिकाणी पाठवून शिक्षण पूर्ण केले.
त्यांची लहान मुलगी शेख आयशा ही सध्या आंबेजोगाई येथे एमबीबीएस च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असून तिचे पण डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. खरोखरच ही बाब अभिमानास्पद आहे. शेख सद्दाम च्या यशाचा अभिमान संपुर्ण योगेश्वरी शुगर्स परिवाराला असून कामगारांच्या मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून योगेश्वरी परिवार नेहमी गुणवंत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतो.तसेच अशा गुणवंताना गरजे वेळी मदतीचा हात ही दिला जाईल अशी प्रतिक्रिया या वेळी देशमुख यांनी व्यक्त केली.