ताज्या घडामोडी

पितृछत्र हरवलेल्या प्रावीन्य प्राप्त मुलीचा केला सत्कार

पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचा उपक्रम.

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

धामणगांव रेल्वे तालुक्यातील चंद्रभागाबाई पाकोडे मंगरूळ दस्तगीर शाळेची गुणवत्ता प्रावीन्य प्राप्त केलेल्या कु.प्रिया पद्माकर वानखडे या मुलीचा समितीने तिच्या निंबोली येथील निवास्थानी जाऊन सत्कार केला.
पदमाकर वानखडे हे एक छोटे व्यावसायिक काम करून आपल्या कुटुंबाचा गाडा ओढत होते. अश्यातच मागच्या वर्षी त्यांचा शेतात गेले असता अंगावर विज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यात प्रिया हि दहावीला वडिलांचे छत्र हरविल्यावर प्रिया खचून न जाता व वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने अभ्यास करून तिच्या शाळेतुन प्रथम तर तालुक्यातुन तिसरा क्रमांक घेतला.
दि.२१/६/२०२३ ला पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ.संघपालजी उमरे साहेब,धामणगांव रेल्वे तालुका प्रमुख मा.बाबारावजी इंगोले,तालुका समन्वयक मा.प्रशांत नाईक यांनी प्रियाची तिच्या घरी निंबोली निवास स्थानी भेट घेतली व तिला पुष्पगुछ व स्कुल बॅग देऊन तिला सन्मानित केले.व सोबतच तिच्या आईचाही सत्कार केला.व कु. प्रियास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व उभ्या आयुष्यात कधीही कोणतीही अडचण आल्यास समिती कडून शक्य तेवढी मदत करण्यात येईल अशे आश्वासन मा.डॉ.संघपालजी उमरे साहेब यांनी प्रियास व तिच्या आईस दिले.याप्रसंगी मा.गोलु उर्कूटकर,मा.राजूभाऊ नेवारे सरपंच,औरंगपुरे उपसरपंच,समीर भाऊ कडू ग्रामीण काँग्रेस कमिटी अध्यक्ष,बोरगाव निस्ताने चे पोलीस पाटील मा. संजयजी विघ्ने साहेब,गावातील नातेवाईक मनोज सोनोने सत्कार प्रंसगी प्रमुख्याने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close