ताज्या घडामोडी

सिरपुर तंमुसने लावला प्रेमीयुगलाचा विवाह

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे

चिमुर तालुक्यातील नेरी येथुन जवळच असलेल्या सिरपुर येथे प्रेमीयुगलाचा तंटामुक्त समितीने विवाह लावुन दिला.
निशा मधुकर गावतुरे व सुभाष पांडुरंगजी आदे दोघेही राहणार सिरपुर यांचे एकमेकांवर प्रेम जळले त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण ते घरच्यांना मान्य नव्हते म्हणुन दोघांनीही तंटामुक्ती समिती सिरपुर येथे रितसर अर्ज केला व कागदपत्रे देऊन विवाह लावुन देण्याची विनंती केली .

त्यानुसार तंटामुक्त समिती अध्यक्ष व सदस्य यांनी कागदपत्रांची पडताळणी व इतर चौकशी करून निशा गावतुरे व सुभाष आदे यांचे रितीरिवाजानुसार लग्न लावुन दिले. यावेळी मा. विलासराव बोरकर अध्यक्ष तमूस शिरपूर ,श्री मंगेशभाऊ भानारकर पो. पा./निमंत्रक, सौ वैशालीताई निकोडे सरपंच, श्री राजेंद्र भानारकर उपसरपंच, श्री मनोहरजी शेंदरे -सदस्य, भगवानजी आदे सदस्य, श्री सुनिलभाऊ गेडाम माजी अध्यक्ष तमूस, श्री दिवाकरजी डहारे सदस्य, श्री. सुनिलजी कोसे सदस्य /पत्रकार,श्री बाळकृष्ण रामटेके रोजगार सेवक, श्री. मंगलदास मडावी ग्रा. पं. कर्मचारी, सौ पुष्पाताई कापगते -सदस्य,सौ डहारेताई -सदस्य तसेच शिरपूर येथील गावकरी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close