शिवाजी पब्लिक स्कूल भिसी मध्ये गणपती विसर्जन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
शिवाजी पब्लिक स्कूल भिसी
मध्ये गणपती विसर्जनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला , त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणुन पंकज मिश्रा सर व्यापारी (संघटन चे अध्यक्ष)ग्रॅन्ड मॉस्टर शिफु -डॉ. सुशांत के. इन्दोरकर , इन्ट्रक्टर कु. समिक्षा इन्दोरकर नेरी इन्ट्रक्टर सुनिल सातपैसे इन्ट्रक्टर समिर पठाण चिमुर उपस्थित होते.
देवडी इथे झालेल्या राष्ट्रीय युथ स्पर्धे मध्ये शिवाजी पब्लिक स्कूल च्या आठ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता .यामध्ये नमन मिश्रा, कोमल लोहकरे, आर्या पारधी, वेदांत गलगले, कृष्णा भोयर, सेजल मिश्रा, अमोल तोतडे, आर्यन कांबळे हे विद्यार्थी सहभागी झाले होते.
त्यातील सात विद्यार्थी पदक जिंकून आले त्यांना सन्मान चिन्ह व ढाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर आराध्या किशोर पारधी ही चित्रकला स्पर्धेमध्ये आंबेनेरी केंद्रातून द्वितीय आली तिचा पण सत्कार करण्यात आला आणि इतर शिवाजी पब्लिक स्कूल मध्ये क्लास सजावट व क्लास स्वच्छता या उपक्रमामध्ये इतर वर्गातील मुलांना बक्षीस देऊन गौरवीत करण्यात आले. यावेळी शिक्षक गण
नितेश उघडे सर, बोरकर सर, अनिता ढोक शिक्षिका, वैशाली कुरटकर शिक्षिका,
वैशाली भसारकर शिक्षिका, पायल उघडे शिक्षिका, चिंचोलकर शिक्षिका, सविता बावनकर शिक्षिका, प्रणाली वाघमारे शिक्षिका, श्वेता गलगले सहाय्यक शिक्षिका , पूजा भसारकर शिक्षिका, हर्षदा धारगावे शिक्षिका, मिथिलेश धारगावे सर हे उपस्थित होते.