ताज्या घडामोडी
ग्रंथालयाला ग्रंथांची भेट

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
वासचाल पुस्तक तर टिकेल मस्तक या उक्ती प्रमाणे वाचन संस्कृती जोपासण्यात यावी या उद्देशाने स्व नितिन महाविद्यालयाच्या वतीने वाढदिवसा निमित्त ग्रंथांची भेट ग्रंथालयाला देऊन तसेच पर्यावरण रक्षणा साठी वृक्षलागवड मोहिम राबवली जाते याचाच एक भाग म्हणुन येथिल हिंदी विभाग प्रमुख प्रा डॉ मारोती खेडेकर यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्त ग्रंथालयाला ग्रंथांची भेट देत आपला वाढदिस साजरा केला. या वेळी ग्रंथपाल कल्याण यादव,महेश तौर किरण घुंबरे आदिंची उपस्थिती होती.