ताज्या घडामोडी
श्री. गजानन ताजने सर यांचे निधन

प्रतिनिधीः हेमंत बोरकर
जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद चंद्रपूर येथील जिल्हा व्यवस्थापक श्री. गजानन ताजने सर 30/7/2024 ला निधन झाले. अत्यंत मनमिळावू व सय्यमी स्वभावाचे होते. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांना उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेत राज्यस्तरावर पदाधिकारी निवड झाली. तसेच त्यांनी नवराष्ट्र, सकाळ व निर्मल महाराष्ट्र या वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केले. काही दिवसापूर्वी त्यांना डेंग्यू या आजाराची लागण झाली होती. त्यानंतर ब्रेन ह्यामरेज होवून त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने जिल्हासह तालुका परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत्युसमयी यांचे वय 47 वर्षाचे होते. त्यांचे पच्छात पत्नी, एक मुलगा व मोठा आप्तपरिवार आहे.