ताज्या घडामोडी

आ. बाबाजानी दुर्राणी साहेबांवर झालेला भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पाथरी बंद

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी पपरभणी

संपूर्ण जिल्ह्याचे आदरणीय नेतृत्व आ. बाबाजानी दुर्राणी साहेबांवर झालेला भ्याड हल्ला अतिशय निंदनीय आहे. त्यांच्यावरील हल्ला हा पाथरी शहराच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. साहेबांनी आजवर शहराची एकता जोपासण्याचे कार्य केलेले आहे व सलोखा टिकवून ठेवला.

आज पाथरी व्यापारी महासंघाची बैठक झाली, बैठकीत सर्व व्यापाऱ्यांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. आरोपीला तडीपार करण्याची मागणी केली, जेणेकरून व्यापाऱ्यांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण होईल. त्या अनुषंगाने झालेल्या घटनेच्या निषेधार्थ व्यापारी संघटनेच्या वतीने उद्या दिनांक २२ नोव्हेंबर(सोमवार) पासून बेमुदत पाथरी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. पेट्रोल पंप, किराणा, भाजीपाला यासह अत्यावश्यक सेवा सुद्धा या बंद मध्ये सहभागी असणार आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close