शिवशंकर यात्रा महोत्सवानिमित्त खेर्डा येथील अखंड हरिनाम सप्ताहाची आज काल्याच्या कीर्तनाने सांगता
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
शिवशंकर यात्रा महोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक 06 एप्रिल 2022 ते 13 एप्रिल 2022 च्या दरम्यान खेर्डा महादेव येथे समस्त गावकऱ्यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची आज श्री ह भ प चांगदेव महाराज काकडे कंडारीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. दिनांक 12 एप्रिल 2022 रोजी श्री लक्ष्मण सिताफळे यांचे शुभहस्ते शिवमहापुराण ग्रंथाची सपत्नीक महापूजा करण्यात आली. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण समाप्ती झाल्यानंतर सर्व गावकऱ्यांच्या वतीने श्री भाऊसाहेब गायके यांच्या शुभहस्ते सपत्नीक ग्रंथ पूजा झाली. तसेच आज काल्याचे किर्तन संपल्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री दीपक आमले यांच्या शुभहस्ते सर्व गावकऱ्यांच्या वतीने श्रींची महाआरती झाली व नंतर महाप्रसाद झाला. यात्रा कमिटीचे श्री ज्ञानेश्वर आम्ले यांच्या मार्गदर्शनात नवसाच्या गाड्या ओढणीचा कार्यक्रम झाला या गाड्या ओढणीच्या कार्यक्रमात गावातील डॉक्टर श्री कृष्णा रमेशराव आम्ले यांनी ग्रामदैवत श्री शंकराची कृपा सर्व ग्रामस्थांवर अविरत रहावी याकरिता श्री शंकराला साकडे घालून गाड्या ओढणीत सहभाग घेतला. रात्री 9 ते 1 या वेळेत श्रींची भव्य पालखी मिरवणूक टाळ मृदंग ढोल ताशाच्या गजरात गावातून निघाली. रात्री 1 ते 4 या वेळेत श्री ह भ प मोहन महाराज पोपळघट व श्री ह भ प त्र्यंबक महाराज आम्ले तसेच गावकरी भजनी मंडळ यांचे सांप्रदायिक भारुडाचा कार्यक्रम झाला. दिनांक 13 एप्रिल 2022 रोजी चे काल्याचे किर्तन श्री शिकंदरखाॅ पठाण यांचे तर्फे श्री देवा गायकवाड यांचे नामसंगकिर्तन या यूट्यूब चैनल वर थेट प्रसारित केले आहे. कीर्तनाच्या थेट प्रसारणासाठी देवा गायकवाड यांना जमीर पठाण व प्रताप आम्ले यांचे विशेष सहकार्य लाभले. दिनांक 14 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेत जंगी निकाली कुस्त्यांचा कार्यक्रम श्री ज्ञानेश्वर आमले यांच्या मार्गदर्शनात पार पडला. अशी माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष श्री अभिजितराव आमले यांनी दिली.