वार्षिक स्नेहसंमेलनात उरकुडपार येथील विद्यार्थ्यांनी सादर केला कलाविष्कार
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
चिमूर पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,उरकुडपार येथे वार्षिक शालेय स्नेहसंमेलन संपन्न झाले.स्नेहसंमेलनाचे उदघाटन सुरेश डांगे यांनी केले.अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच प्रवीण सावसाकडे होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देविदास श्रीरामे,पोलीस पाटील सुरज मोरे,उपसरपंच रमेश काळे,शंकरराव घरत,गदगावचे सरपंच राजू मुरकुटे,छत्रपाल लोखंडे, रवींद्र रोडगे, सुनंदा गेडाम,दुवादास गेडाम,प्रकाश कोडापे,बंडू नन्नावरे, सैंद्रपाल शंभरकर,रवींद्र उरकुडे,गोवर्धन ढोक आदी उपस्थित होते.
या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्ताने शाळेतील विदयार्थ्यांनी आपल्या विविध कला सादर केल्या.नृत्य,नक्कल,नाटूकले,गायन,एकांकिका आदी विविध कलाविष्कारांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.शाळेचे मुख्याध्यापक रावन शेरकुरे व सहाय्यक शिक्षक प्रमोद मायकुरकर यांचा ग्रामस्थानी शाल,पुष्पगुछ व भेटवस्तू देऊन सत्कार केला.नावीन्यपूर्ण नवरत्न स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्वरा रामेश्वर गेडाम व जान्हवी अरुण नन्नावरे या विद्यार्थीनींचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन पाहुण्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन प्रमोद मायकुरकर यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक रावन शेरकुरे यांनी तर आभार आशिष वाघमारे यांनी मानले.