ताज्या घडामोडी

वृक्षारोपण शिवाय पर्याय नाही – ब्रह्मा कुमारी मीरा दीदी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक १ जुलै २०२२ वार शुक्रवार रोजी ग्रामीण रुग्णालय सोनपेठ या ठिकाणी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था व प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा सोनपेठ च्या वतीने हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती व महाराष्ट्र कृषी दिवस आणि राष्ट्रीय डॉक्टर दिवस अशा त्रिवेणी संगमाचे अवचित्य साधून वसंतराव नाईक यांची जयंती कार्यक्रम तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असता. ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या वतीने ब्रह्माकुमारी मीरा दिदी यांनी उपस्थित सर्व डॉक्टर्स यांचे वृक्ष भेट देऊन डॉक्टर दिनाच्या हरितमय शुभेच्छा दिल्या तसेच वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून जयंतीनिमित्त डॉक्टर .सुभाष पवार, सर यांनी व डॉक्टर सिद्धेश्वर हालगे यांनी आपले मनोगत व्यक्त करते वेळी वसंतराव नाईक यांचा जीवन प्रवास सर्वांना सांगितला.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या ब्रह्माकुमारी मीरा दीदी यांनी आपले विचार व्यक्त करत असताना सर्वप्रथम सर्व डॉक्टर यांना कोरोना काळात सर्व रुग्णांना जीवाची परवा न करता सेवा करणाऱ्या डॉक्टरांना डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा दिल्या व पुढे बोलताना मीरा दीदी यांनी सांगितले की , ठेवून शेतीचे भान, जीवाच करतो तो रान , पिकवतो तू म्हणून वाढलं जातं पान, बळीराजा तूच खरी महाराष्ट्राची शान….. तसे पाहता भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो 70% लोक हे गाव खेड्यामध्ये निवास करतात, महात्मा गांधी नेहमीच म्हणायचे चला खेड्याकडे .भारत देशाला व्यवसायाचे साधन म्हणून पर्यायाने शेती शिवाय दुसरा पर्याय नाही आणि प्रत्येक क्षेत्रातील पदाधिकारी असोत व्यापारी असोत किंवा इतर कुठल्याही कार्यक्षेत्रातील व्यक्ती असो प्रत्येक जण हा शेतकऱ्याचा मुलगा आहे मुलगी आहे. म्हणून आपली प्रत्येकाची नाळ शेती आणि मातीशी जोडलेली आहे. आपण ग्रामीण रुग्णालय सोनपेठ या परिसरामध्ये विविध वृक्षांचे वृक्षारोपण करणार आहोत कारण येत्या भावी काळा साठी वृक्ष रोपण शिवाय पर्याय नाही . वृक्षारोपणासाठी तयार केलेली रोपे बदाम , कडू निंब, सीताफळ ,उंबर ही रोपे स्व मेहनतीने बीजारोपणापासून सांभाळ करून तयार केलेली रोपे आहेत. कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर आदरणीय ब्रह्माकुमारी मीरा दीदी देविदास वाडकर, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय शाखा सोनपेठ संचालिका व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था सोनपेठ तालुका महिला अध्यक्ष. तसेच डॉक्टर .सुभाष पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी सोनपेठ , डॉक्टर. सिद्धेश्वर हालगे डॉक्टर .स्वप्नील जोशी, डॉक्टर. देशमुख मॅडम, डॉक्टर .चव्हाण सर, तसेच आरोग्य कर्मचारी महेश मिसाळ, संदीप , गोविंद राठोड, केदार रासवे ,माधव हाके etc ग्रामीण रुग्णालय परिसर सोनपेठ या ठिकाणी वरील मान्यवरांच्या हस्ते वृक्ष रोपण करण्यात आले . कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी डॉक्टर. सुभाष पवार, डॉक्टर. सिद्धेश्वर हालगे, ब्रह्माकुमारी मीरा दीदी यांनी मेहनत घेतली….

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close