ग्रामविकास संघ यांच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
तालुका प्रतिनिधी:महेश शेंडे गोंडपिपरी
दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामविकास संघ सोमनपल्ली तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री.वासुदेवजी देठेकर माजी सरपंच तथा ग्राम पंचायत सदस्य सोमणपल्ली यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की जाणून जबाबदारीला वागत असते ती महिला,गगनभरारी घेऊनही जमिनीवरच असते ती महिला,ती कधी पत्नी असते तर कधी आई,कधी मुलगी असते तर कधी ताई असे उद्देशून सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यात ग्रुप डान्स, गितगायन,तसेच संगीत खुर्ची या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हरिभाऊ नेवारे माजी उपसरपंच ग्राम पंचायत सोपनपल्ली, डॉ, काजल कुमार मेश्राम, बांबोले सर ग्रामसेवक,सोमित्र मोहूर्ले,बाबुराव अलोणे,,संदीप भाऊ नेवारे सचिव आदिवासी गोवारी जमात संघटना तालुका चामोर्शी आणि मुलचेरा, सौ मंगलाताई भेंडारे पोलीस पाटील, ज्योत्स्ना मेडपल्लीवार,रेखा गाजुलवार,शालू सरवर,कमल मोहुर्ले,हसीना पेरुगुरवार,ठाकूर सर,शेडमाके मॅडम,योजना कोसनकर मॅडम,प्रीतम घोनमोडे इत्यादींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.यास्मिनी संदीप नेवारे यांनी केले तर प्रास्ताविक आणि आभार सौ.सुनिता सुरेश मेकर्तिवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील सर्व महिला वर्गानी उत्स्फूर्त सहभाग घेतला.