ऑल इंडिया पँथर सेना चक जांभुळविहीरा येथे संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी दि . २६ नोव्हेंबर १ ९ ४ ९ ला देशाला भारताचे संविधान अर्पण केले . या देशातील समस्त भारतीयांना समता , स्वातंत्र , बंधुता व न्याय या तत्वांच्या आधारे त्यांचे हक व अधिकार बहाल केले . या देशातील विषमता वादी समाज व्यवस्था नष्ट करून मानवी समतामुलक समाजव्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून व एक मजबूत बलशाली भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने या देशाला संविधान अर्पण केले . तो दिवस भारतवासियांसाठी सुवर्ण दिवस आहे त्याची माहिती समस्त भारतीय नागरिकांना व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे . आपण संविधान साक्षरता चळवळीला तन – मन – धनाने सहकार्य करून कार्यक्रम प्रसंगी बहुसंख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान ऑल इंडिया पँथर सेना चक जांभुळविहीरा यांचे कडून करण्यात आले आहे.
