मोहूर्ली येथे जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन
यंग स्टार क्रीडा मंडळ मोहूर्ली यांच्या वतीने भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन..!!
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
मूलचेरा तालुक्यातील मल्लेरा ग्राम पंचायत अंतर्गत असलेल्या मोहूर्ली येथे यंग स्टार क्रिडा मंडळ यांच्या वतीने भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला, दूसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे. पहिले पारितोषिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून देण्यात येणार आहे.
आज सदर स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मल्लेरा ग्राम पंचायतचे सरपंच उमेश कडते, प्रमुख अतिथि म्हणून चेलावार काकाजी, ग्रा.पं. सदस्य विनायक राजूलवार, दिशा नैताम, आशा मुजुमदार, पो.पा. गुरुदास नैताम, जूलेख शेख, मूत्ता नैताम, सतीश पोरतेट, प्रभास मीस्त्री, रविंद्र झाडे, रेकनकर, गर्तूलवार, तपन मालिक, राबिण मिस्त्रि, रापेलीवार, कार्तिक पिल्लेलवार, सुधाकर बर्लीवार, सुनील चंद्रगिरीवार, अनिल मेकलवार, शंकर गोटामवार, बालाजी मादावार, देवाजी बंडावार, राजेश चौधरी, बानेश आलाम, राजेश नैताम, धम्मशील दुर्गे, साईंनाथ बर्लीवार, भास्कर मडावी तसेच मंडळाचे अध्यक्ष पोचूराम बंडामवार, उपाध्यक्ष सुनील चंद्रगिरीवार, सचिव स्वप्नील नैताम, कोषाध्यक्ष महेश मेगलिवार, मुन्नाजी नैताम, प्रज्वल बंडावार, सागर चंद्रगिरीवार, विशाल नैताम, हंसराज दुर्गे, समीर सोनटक्के, आबाजी बंडावार, सचिन मंटकवर, अतिक आलाम, रामपाल डुबुलवार, गुरुदास बंडावार, उमेश मंटकवार, संजय राजूलवार, विश्ववंतराव बंडावार, देवराव डुबुलवार, संपतराव बंडावार, काशीनाथ बर्लीवार व गावातील नागरिक उपस्थित होते.