ताज्या घडामोडी

अंगणवाडी सेविका व मदतनिस यांचे कोरपन्यात ठिय्या आंदोलन सुरुच

मागण्यांची झाली नाही अद्याप पूर्तता ! आंदोलनाचा आजचा ११ वा दिवस

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

आपल्या न्याय मागण्यां पदरात पाडून घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनिस यांचे धरणे आंदोलन सुरू असून चंद्रपूर जिल्ह्यातही शेकडों अंगणवाडी सेविका व मदतनिस या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत.गेल्या कित्येक वर्षांपासून त्या आपल्या रास्त मागण्यांसाठी लढा देत असून अद्यापही त्यांच्या मागण्यांची पूर्तता झाल्याचे दिसून येत नाही.शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील अंगणवाडी सेविका व मदतनिस यांनी तहसिल कार्यालया जवळ ठिय्या आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाचा आज ११वा दिवस असल्याचे कल्पना मांदाडे यांनी या प्रतिनिधीस सांगितले.या सुरू असलेल्या धरणा आंदोलनाचे नेतृत्व गुजाताई डोंगे,विमल जेणेकर,शोभा काकडे, कल्पना मांदाडे,रेखा वरारकर, निर्मला इटनकर, मंगला खडसंग उषा खिरटकर, माधूरी भांडारकर, प्रतिभा निब्रड ,वर्षा खाडे आदिं करीत आहे .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close