ताज्या घडामोडी

आमदार डॉ परिणय फुके यांच्या प्रयत्नातून अखेर साकोली नगर परिषद पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावास मान्यता

प्रतिनिधी: गणेश पगाडे लाखनी

साकोली नगर परिषद येथे मुलभुत सुविधा अंतर्गत पाण्याची स्वतंत्र पाणी पुरवठा मंजुर करण्यात यावी जेणेकरून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती न करता पाणी उपलब्ध व्हावे म्हणुन नगरसेवकांनी ही अडचण आमदार डॉ परिणय फुके यांच्या निदर्शनास आणुन देवून पाणी पुरवठा योजना मंजुर करावी अशी मागणी केली होती.

त्यानुषंगाने डॉ फुके यांनी जलसंपदा मंत्री या पत्र लिहुन महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत साकोली नगरपरिषद पाणी पुरवठा योजना करीता निन्न चुलबंद बॅरेजमधुन पाणी मिळण्याकरीता आरक्षण द्यावे अशी मागणी केली. आरक्षणबाबतचा निर्णय हा कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांना असुन तशी परवानगी द्यावी असे सुचित केले.

त्या अनुषंगाने, आज दि.२१/०९/२०२१ रोजी कार्यकारी संचालक श्री मोहीते यांची भेट घेवून पाणीपुरवठा आरक्षणाच्या प्रस्तावावर चर्चा केली. कार्यकारी संचालक यांनी चर्चा करून निन्न चुलबंद प्रकल्पातुन पाणी पुरवठा आरक्षण प्रस्तावाच्या मान्यतेचे पत्र डॉ परिणय फुके यांच्या समस्त साकोली नगर परिषदेच्या अध्यक्षा धनवंता राऊत यांना दिले. लवकरच तांत्रिक मान्यता प्रदान करून कामास शक्य तितक्या लवकर सुरू करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी नगर परिषद उपाध्यक्ष श्री जगनजी उईके, नगरसेवक श्री रवि परशुरामकर, नगरसेवक श्री मनिष कापगते, नगरसेवक श्री पुरूषोत्तम कोटांगले, नगरसेवक श्री हेमंत भारद्वाज, श्री ईशवजी राऊत उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close