ताज्या घडामोडी

केंद्र सरकारच्या महागाई विरोधात तहसील कार्यालय समोर गोंडपिपरी तालुका काँग्रेसचे एक दिवसीय धरणे आंदोलन

तालुका प्रतिनिधी:महेश शेंडे गोंडपिपरी

दिनांक ४ एप्रिल रोज सोमवारला तहसील कार्यालय गोंडपिपरी समोर तालुका काँग्रेस गोंडपिपरीच्या वतीने केंद्रातील मोदी सरकारच्या महागाई विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार लोकप्रिय आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांचे मार्गदर्शनातून राजुरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मा.अरुणभाऊ धोटे यांचे नेतृत्वात गोंडपिपरी येथील तहसील कार्यालयासमोर गोंडपिपरी तालुका काँग्रेस च्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेलासह अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वारेमाप दरवाढ करून गोरगरीब, सर्वसामान्य जनतेची लूटमार करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात महागाई मुक्त भारत हे ब्रीद घेऊन एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राजुरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय अरुणभाऊ धोटे यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर सडकून टीका करत म्हणाले की, पूर्वी ३५० रुपयाचा सिलेंडर आता १०५० रुपयाला झाला, पूर्वी पेट्रोल ६० रुपये लिटर होते,आता १२० रुपये लिटर झाले,तसेच डिझेलच्या किमतीत सुध्दा पूर्वीच्या प्रमाणात दुप्पट वाढ झाली, त्याचप्रमाणे अन्य जीवनावश्यक वस्तूची गगनाला भिडणारी दरवाढ चिंताजनक आहे यासाठी केंद्रातील मोदी सरकारला खाली उतरविल्याशिवाय जनसामान्यांचे जीवन जगण्याचा पर्याय राहणार नाही असे भावनात्मक उदगार यावेळी राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांनी व्यक्त केले. पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत दररोज होणारी दरवाढ आणि महागाईने सामान्य जनतेचे हाल होत आहेत. केंद्र सरकारने ही दरवाढ तातडीने थांबवून बेसुमार केलेली दरवाढ कमी करावी अन्यथा जनता या सरकारला धडा शिकविल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही.यासह तालुक्यातील अनेक काँग्रेस नेत्यांनी सुधा विशेष मार्गदर्शन करून मोदी सरकारच्या महागाई विरोधात आवाज बुलंद करून आंदोलन केले.धरणे आंदोलना नंतर केंद्र सरकारने महागाई कमी करून गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी करणारे निवेदन गोंडपिपरी तहसीलदार साहेब यांच्या माध्यमातून भारताचे महामहिम राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले. या प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, शहराध्यक्ष देवेंद्र पट्टे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, नगराध्यक्ष सविता बबलू कुडमेथे,युवा तालुकाध्यक्ष संतोष बंडावार, महिला तालुकाध्यक्ष रेखाताई रामटेके, बाजार समिती माजी उपसभापती अशोक रेचनकर, नगरसेवक राकेश पुन,महिला व बालकल्याण सभापती वनिताताई वाघाडे, पाणीपुरवठा विभाग सभापती सचिन चींतावार, बांधकाम सभापती सुरेश चीलनकर, नगरसेवक सुनील संकुलवार,अनिल झाडे, निराधार समिती अध्यक्ष विनोद नागापुरे, पोडसा सरपंच देवीदास सातपुते, सचिन फुलझेले, अनु. जा. विभाग तालुकाध्यक्ष गौतम झाडे, खेमचंद गरपल्लिवार, युवा उपाध्यक्ष जितेंद्र गोहणे, बबलू कुळमेथे, नामदेव सांगळे,तूकेशजी वानोळे, सुनील फुकट,वासुदेव नगारे, प्रवीण नरहरशेट्टीवार, भैया भाऊ चुदरी,दर्शनाताई दुर्गे, महेंद्र कुनघाटकर, श्री. कोटणाके गोजोली,अनु.जाती उपाध्यक्ष आशीर्वाद पिपरे, अनिल कोरडे, सालेझरी सरपंच राजू राऊत,अजय माडूरवार, बालाजी चनकापुरे, श्रीनिवास कंदनुरिवार, यासह तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल काँग्रेस, युवक काँग्रेस, अनुसूचित जाती व जमाती विभाग काँग्रेस, अल्पसंख्यक विभाग काँग्रेस, ओबीसी काँग्रेस,एनएसयूआय,किसान सेल अशा काँग्रेसच्या सर्व विभागाचे पदाधिकारी, महीला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन महागाई विरोधात धरणे आंदोलन करून आवाज उठविला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close