आजादी का अमृत महोत्सव 2022 वर्ष अंतर्गत पथनाट्य थिम पर्यावरण जागृती , स्वच्छता मोहीम
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
कै. रमेश रावजी वरपूडकर महाविद्यालय सोनपेठ व ब्रह्मकुमारी सोनपेठ व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठवाडा मुक्ती संग्राम आजादी का अमृत महोत्सव 2022 वर्ष
अंतर्गत पथनाट्य थिम पर्यावरण जागृती , स्वच्छता मोहीम….. दिनांक २२ डिसेंबर २०२२ वार गुरुवार, वेळ – सकाळी ११ 00 ठिकाण – के. रमेश राव वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ या ठिकाणी मोठ्या उत्साहात पर्यावरण जागृती व स्वच्छता मोहीम जागृती पर पथनाट्य ज्युनियर कॉलेज विद्यार्थ्यांच्या कलेतून सादरीकरण करण्यात आले तसेच या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा . श्री. परमेश्वर रावजी कदम, हनुमान शिक्षण प्रसारण मंडळ अध्यक्ष तसेच उद्घाटक श्री. विठ्ठल केदारे मुख्याधिकारी सोनपेठ,व प्रमुख पाहुणे म्हणून ब्रह्मकुमारी मीरा दीदी ब्रह्माकुमारी सोनपेठ संचालिका तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था तालुका महिला अध्यक्ष , डॉ. बालाजी पारसेवार, बळीराम काटे, भागवत पोपडे, प्रा.डॉ. वसंत सातपुते , किरण स्वामी जी तसेच शेख शकीला मॅडम यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली व स्वच्छता व आरोग्य या विषयावर विठ्ठल केदारे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व परमेश्वर रावजी कदम यांनी अध्यक्ष समारोप केला, रणखांब मॅडम यांनी कार्यक्रम चे सूत्रसंचालन केले तसेच महालिंग मेहेत्रे यांनी आभार व्यक्त केले. तसेच कार्यक्रमासाठी कैलास वासी रमेश वरपूडकर महाविद्यालय सोनपेठ कॉलेजचे सर्व विद्यार्थी व एल आर के इंग्लिश स्कूल चे टोटल ५०० विद्यार्थी व सर्व टीचर व प्राध्यापक स्टॉप उपस्थित होते व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी शेख शकील ,मीरा दीदी यांनी परिश्रम घेतले.