कोरोना जाता जाईना
तालुका प्रतिनिधी : हेमंत बोरकर मुल
गेल्यावर्षी 22 मार्च पासून कोरोनाच्या भीतीने सर्व विवाह सोहळे, सामाजिक कार्यक्रम रद्द करण्यात आले तर कुठे साध्या पद्धतीने व कोणाचे सर्व नियमांचे पालन करून विवाह सोहळे करण्याची वेळ आली होती. यावर्षी ग्रामीण व शहरी भागात कोरोनाचे प्रमाण वाढल्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण वाढले असताना प्रशासनाकडून निर्बंध लावले गेले आहे. त्यामुळे सध्यास्थितीत सुरू असलेले विवाह सोहळ्यातील वधु परिवाराची चिंता वाढली आहे.
गेल्या वर्षी कोरोना मुळे अनेक विवाहसोहळे रद्द झाली होती त्यामुळे लग्नासाठी केलेल्या सर्व तयारीवर पाणी फिरले गेले त्यामुळे ठरल्यात तिथी पुढे ढकलण्यात आल्या व बरेच लग्न सोहळे साध्या पद्धतीने उरकून घेतले उर्वरित लग्नसोहळे सुरू होताच पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढल्याने प्रशासनाकडून अनेक नियम व निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे अनेक संकटं निर्माण झाली आहेत.
कोरोनामुळे व्यावसायिक तसेच मजदार वर्गांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.