ताज्या घडामोडी

आष्टी येथे आष्टी पोलिस स्टेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर

1 मे 2019 रोजी जांभूळखेडा भुसूरुंग स्फोटात पंधरा जवानांना वीरमरण आले होते त्यांच्या स्मरणार्थ ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे आष्टी पोलिस स्टेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

पोलीस अधिक्षक गडचिरोली अंकीत गोयल , अप्पर पोलीस अधिक्षक गडचिरोली अभियान सोमय मुंडे , अप्पर पोलीस अधीक्षक गडचिरोली प्रशासन समीर शेख ,अप्पर पोलीस अधिक्षक अहेरी अनुप तारे, यांचे प्रेरणेने व उपविभागीय पोलिस अधिकारी अहेरी अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनात,
आज दिनांक ०१/०५/२०२२ रोजी महाराष्ट्र दिना निमित्य सकाळी ०७:१५ वाजता झेंडावंदनाचा कार्यक्रम आष्टी पोलीस स्टेशन मध्ये घेण्यात आला .
तसेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या संकल्पनेतून सकाळी ०७:४५ वाजता मौजा-आष्टी येथील स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला व सदर ठिकाणी एकूण-१२ वृक्षांची लागवड करण्यात आली.
तसेच गडचिरोली पोलीस दला अंतर्गत ०१ मे २०१९ रोजी जांभुळखेडा भूसुरुंग स्फोटात पंधरा जवानांना वीरमरण आले होते. त्यांच्या स्मरणार्थ ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून पोलीस स्टेशन आष्टी हद्दीतील मौजा- आष्टी, लक्ष्मणपूर, वसंतपूर, अडपल्ली चेक, ईलुर, ठाकरी, दुर्गापुर, मुधोली चेक नं.१, मुधोली रिट, अनखोडा, कढोली, सोमनपल्ली, इत्यादी गावावरून नागरिकांना रक्तदानाचे महत्त्व पटवून रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हा असे आव्हान आष्टी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी केले असता सदर नागरिकांनी स्वतःहा सहभाग घेऊन ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे रक्तदान करून ०१ मे २०१९ रोजी शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सदर रक्तदान शिबिरामध्ये एकूण-१२५ नागरिकांनी तसेच पोलीस स्टेशन आष्टी येथील पोलीस निरीक्षक कुंदन गावडे व पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले तसेच अंमलदार यांनी रक्तदान केले.
सदर कार्यक्रमास पोलीस स्टेशन आष्टी येथील सर्व अधिकारी व अंमलदार ,पोलीस कर्मचारी तसेच ग्रामीण रुग्णालय आष्टी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देव्हरी, डॉक्टर निंबोळकर, डॉक्टर दामोदरे, डॉक्टर डोर्लीकर , योगेश राऊत ,मनीष कस्तुरे, सिद्धी पुप्पलवार, करिष्मा पेरमवार त्यांचे कर्मचारी वृंद तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक हजर होते. सदरचा कार्यक्रम सकाळी ०८:४५ वा. सुरू करून सायं. 4:०० वा. संपविण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आष्टी पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले तसेच अति पत्रकार संघटनेचे सर्व पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते त्यांचेसुद्धा आष्टी पोलीस स्टेशन च्या वतीने आभार मानले आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close