ताज्या घडामोडी

मेन रोड ते टेकूलगुडा पर्यंत खड़ीकरण रस्ता बांधकामचे भूमिपूजन

जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

अहेरी जवळील टेकूलगुडा येते जाण्यासाठी रस्ता नसून नागरिकांना अडचण निर्माण होत होती त्यामुळे जिल्हा परिषदेतून जिल्हा निधीतून २० लाख रुपये मंजूर केले आहे.
अहेरी -खमनचेरू मुख्य रस्तावरून मेन रोड ते टेकुलगुडा पर्यंत खड़ीकरण रस्ता मंजूर झाले असून सदर रस्ता बांधकामाचे भूमिपूजन जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आली.
पावसाळयात रस्ता चिखल होऊन नागरिकांच्या आरोग्यवर परिणम होत असतो व चिखलातून ये-जा करावा लागत होतो त्यामुळे रस्ता बांधकाम आवश्यक असल्याने सदर रस्ता मंजूर करण्यात आली असून आज भूमिपूजन कार्यक्रम सम्पन्न झाला. असून नागरिकांना सोईचे होईल.
सदर रस्ता भूमिपूजनाच्या वेळी,जिल्हा परिषद सदस्या कु.सुनीता कुसनाके,जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,खमनचेरू ग्राम पंचायतचे सरपंच श्री.शायलू मडावी उपसरपंच श्री.नितीन कोडापे,ग्रा.प.सदस्या चंद्रकला मडावी,माजी उपसरपंच श्री.अशोक येलमूले,महागाँवचे माजी उपसरपंच श्री.मारोती करमे,संतोष देव्हारे,दिपक कुसनाके,तसेच आदिवासी विध्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close