ताज्या घडामोडी

शिवसेना प्रमुखांच्या जयंती निमित्त नेत्र तपासणी शिबिर संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथे देवनांद्रा जि प सर्कलच्या शिवसेना युवासेना शाखेच्या वतीने हिंदू-हदय सम्राट शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मंगळवार २१ जानेवारी रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच अल्पदरात मोतीबिंदू शस्रक्रीया शिबिर आणि नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.


या शिबिरात दिडशे वर रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यात मोतीबिंदू असलेले १२ रूग्ण आढळून आले.

या शिबिरा साठी युवासेचे सिद्धेश्वर इंगळे पाटील, शिवसेना शाखाप्रमुख केशवराव खुडे, गावचे सरपंच भाऊराव इंगळे, उपसरपंच विठ्ल कदम, कृष्णा कांबळे, डॉ. स्वामी, भालचंद्र नेत्रालय पाथरी, सुरेश इंगळे, शिवाजीराव इंगळे, भागवत इंगळे , करण इंगळे, हनुमान इंगळे, करण कदम, अजय कदम, सीताराम धोतरे , परमेश्वर धोतरे हे उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close