विरेंद्र यशवंत म्हात्रे हे ‘राष्ट्रीय समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पहला वर्धपन दिन अधिवेशना निमित्त स्वतंत्र संपादक पत्रकार संघा कडून भव्य राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा कुणबी समाज हाल म्हसा येथे यांच्याहस्ते नेरुळगावचे सुपुत्र व लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे संस्थापक/अध्यक्ष -विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांना राष्ट्रीय समाजरत्न – २०२२ पुरस्काराने, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
विरेंद्र म्हात्रे यांनी नवी मुंबई शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील बातम्या देण्याचे काम केले आहे. कोरोना महामारीच्या कालावधीतही लोकोपयोगी माहिती दिली. ते नवी मुंबई येथील आनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना यापूर्वी पञकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी राष्ट्रीय किर्तनकार व समाजप्रबोधनकार ह.भ.प. निलेश महाराज कोरडे,यशवंतराव चव्हाण फाउंडेशनचे संस्थापक श्री. संजय सावंत, स्वतंत्र संपादक पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार, स्वतंत्र संपादक पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गौरव शेलार , स्वतंत्र संपादक पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय महिला अध्यक्षा ज्योति शेलार इतर समाजसेवक आदी पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.