पत्रकार परिषद घेत महायुती सरकारचा रिपोर्ट कार्ड केला सादर

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मागील दोन वर्षाच्या कालखंडात महायुती सरकारच्या वतीने शेती,आरोग्य,शैक्षणिक,सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा रिपोर्ट कार्ड शिवसेना,भाजपा आणि राष्ट्रवादी पक्ष यांच्या वतीने संयुक्तिक पत्रकार परिषद घेऊन सादर करण्यात आला. विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना आतापर्यंत केलेल्या कामांचा लेखाजोखा आणि सर्वसामान्य लोकांचा विविध योजनेच्या माध्यमातून विकासाचा आणि आनंददायी जीवनमानाचा आलेख कसा वाढत गेला याविषयी विस्तृत चर्चा करण्यासाठी शिवसेना अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी परभणी जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडिया क्षेत्रातील मान्यवर पत्रकार बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना शिवसेना नेते सईद खान व भारतीय जनता पक्षाचे नेते उद्धव नाईक यांनी पत्रकारासमोर सरकारच्या विविध कल्याणकारी योजनेचा पाढाच वाचला. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना जिल्हाप्रमुख नाना टाकळकर, शिवसेना युवासेना प्रमुख अमोल भाले पाटील,शिवसेनेचे एकनाथ शिंदे,एल आर कदम,वाव्हळ भारतीय जनता पक्षाचे शिवराज नाईक,राष्ट्रवादीचे अजिंक्य नखाते इत्यादींचे प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आपल्याला महायुतीच्यावतीने पाथरी विधानसभेची उमेदवारी मिळाल्यास निश्चितच महायुतीची सरकारने केलेली विविध विकास कामे व जनतेच्या आशीर्वादाने निवडून येण्याची शाश्वती असल्याचे शेवटी सईद खान यांनी सांगितले.