ताज्या घडामोडी

परिवार विकास फाउंडेशन व ग्रामीण भारत गृह उद्योग मंडळच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क रोगनिदान शिबीर कार्यक्रम संपन्न

उपसंपादक :विशाल इन्दोरकर

आरोग्य धनसंपदा हि उक्ती आजपर्यंत आपण ऐकत आलो आहोत परंतु आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे हे कोरोनाच्या काळात आपण शिकलो कोरोना परिस्थितीमध्ये जनतेच्या आरोग्याची किंवा आपणच आपल्या स्वतःच्या आरोग्याची कोणत्या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे हे पटवून देणाऱ्या अनेक संस्था समोर आल्या यापैकी “आरोग्यमिञ” या जन आरोग्य हेल्थ कार्डचे महत्वपुर्ण विशेषांक जनतेपर्यंत रूजु करण्याकरीता परिवार विकास फाऊंडेशन यांच्या विद्यमाने बँरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सांस्कृतिक भवन डाँ. बाबासाहेब आंबेडकर अर्धाकृती पुतळा बाबुपेठ, चंद्रपूर येते नि:शुल्क आरोग्य तपासणी कार्यक्रम जनतेच्या आरोग्यासाठी व निरोगी जनता राहण्याकरीता जनहितार्थ सेवेकरीता घेण्यात आले. परिवार विकास फाऊंडेशन यांच्या वतीने कार्यक्रम राबविण्यात आला.
यावेळी निशुल्क आरोग्य शिबिरचा लाभ डाँ. आंबेडकर वार्ड बाबुपेठ, चंद्रपुर येथिल नागरिकांनी शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतले, यावेळी नागरिकांना थोड्या प्रमाणात “आरोग्यमिञ”या (हेल्थ कार्ड) चे महत्व सहजरीत्या पटवुन दिले.
या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. माधुरी मानवटकर, कार्यक्रमाचे उद्घाटक मा. भूषण पुसे, विषेश अतिथी मा. विनोद लभाने, मा. शशिकांत मेश्राम, मा. राजू कुडे उपस्थित होते. तसेच शिबिरास उपस्थित तज्ञ डॉक्टर मा. डॉ. माधुरी मानवटकर (जनरल सर्जन), मा. डॉ. उल्हास बोरकर (अस्थिरोग तज्ञ), मा. डॉ. संपदा दिक्षित (त्वचारोग तज्ञ), मा. डॉ. प्रदिप मंडल (जनरल फिजिशियन), मा. डॉ. दिपक चव्हाण (दंतरोग तज्ञ), मा. डॉ. शिल्पा टिपले (स्त्रीरोग तज्ञ) वरील महत्वांकांशी विषयाचा जनतेने लाभ घेतला.
यावेळी संदर्भिय परिवार विकास फाऊंडेशनच्या माध्यमातुन उपस्थित मा. संचालक महेश भंडारे, मा. हेमंत ञिवेदी, मा. शुभम शुक्ला, मा. श्याम शुक्ला, टिम मॅनेजर मा. प्रशांत रामटेके (पत्रकार), मा. नितेश मुन तसेच ग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळाच्या वतीने मा. अशोक अंबागडे, प्रशिल भेसेकर, किसन बोबडे व परिवार विकास फाऊंडेशन आणि ग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळ चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close