नेरीत संपन्न होतोय शहर व्यापारी असोसिएशनचा स्नेह मिलन सोहळा

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
चिमूर तालुक्यातील नेरी हे शहर व्यापारी दृष्टीने अति महत्त्वाचे असून गेल्या 38 वर्षापासून नेरी शहर व्यापारी असोसिएशनचे कार्य अखंडपणे व अविरत सुरू आहे. संवेदनाच्या शक्तीने जोडलेली ही माणुसकीची नाती नेरी शहर व्यापारी असोसिएशनच्या कार्याची बळ आहे. याचाच एक भाग म्हणून नेरी शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीने पारिवारिक स्नेह मिलन सोहळा दिनांक ८ ऑक्टोंबर 2023 रोज रविवारला श्री गुरुदेव सेवा मंडळ नेरी येथे आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमात नेरी शहर व्यापारी असोसिएशन भगिनींकरिता हळदी कुंकू कार्यक्रम आणि मान्यवरांचे सत्कार आयोजित केलेले आहे. सत्कार मूर्ती म्हणून या चिमूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ उर्फ कीर्ती कुमार बांगडिया चिमूर विधानसभा क्षेत्र, व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध नाट्य कलावंत माननीय सुरेशभाऊ नारायण कामडी, नवनिर्वाचित कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती माननीय रवींद्र सोमाजी पंधरे, ग्रामपंचायत सदस्य माननीय निखिल भाऊ पिसे आणि ग्रामपंचायत सफाई कामगार माननीय बबलूजी मोगरे यांचा यावेळी असोसिएशन तर्फे सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय सौ रेखाताई नानाजी पिसे सरपंच ग्रामपंचायत नेरी, माननीय धनराज जी मुंगले तालुका व्यापारी महासंघ अध्यक्ष चिमूर, माननीय दादारावजी पिसे गुरुजी अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ नेरी, माननीय मनोज चांगोरावजी गभने साहेब पोलीस निरीक्षक चिमूर, माननीय राजेश शाहू साहेब संचालक न्यू भारत गुड्स गॅरेज नागपूर, माननीय सदानंद खत्री जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष चंद्रपूर, महेशजी डेंगानी जिल्हा व्यापारी महासंघ सचिव, प्रवीण सातपुते अध्यक्ष चिमूर शहर व्यापारी असोसिएशन तसेच बबनजी बनसोड चिमूर शहर व्यापारी असोसिएशन इत्यादी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी कार्यक्रमाला संपूर्ण व्यापारी यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आव्हान अध्यक्ष नेरी व्यापारी असोसिएशन अध्यक्ष मंगेश चांदेकर आणि संपूर्ण कार्यकारणी यांनी केले आहे.