ताज्या घडामोडी

सरस्वती ज्ञान मंदिर , नागभीड येथे प्रवेशोत्सव समारंभ

कोरोना काळातील शैक्षणिक नुकसान शिक्षकांनी भरून काढावे- संजय गजपुरे

तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड

स्थानिक सरस्वती ज्ञान मंदिर , नागभीड येथे इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा ‘प्रवेशोत्सव’ कार्यक्रम आनंदी व मंगलमय वातावरणात पार पडला…!!
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष व माजी जि.प.सदस्य संजय गजपुरे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक पानसे सर,वाडीकर मॅडम,गोंडाने सर, पालक प्रतिनिधी म्हणून श्री.कळंबे,श्री.दोडके,सौ.नान्हे,सौ.टेकाम,सौ.मोहूर्ले,सौ.त्रिबंके,श्रीमती सहारे यांची उपस्थिती होती.
इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी कु. सलोनी सहारे,कु. सिद्धी खापरे,कु. शर्वरी कुर्झेकर यांनी स्वागतगीताने पाहुण्यांचे स्वागत केले. यानंतर सहावीच्या विद्यार्थिनी कु. आचल सहारे,कु. मितन मेश्राम यांनी इयत्ता पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे औक्षवण केले . यानंतर उपस्थित पाहुण्याच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना बिस्कीट पॉकेट व शालेय पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.
या प्रवेशोत्सव कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना संस्था अध्यक्ष संजय गजपुरे यांनी प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले तसेच कोरोना काळानंतर नियमित शाळा सुरू झाल्याने कोरोना काळात झालेले नुकसान भरून काढण्याची जबाबदारी शिक्षकांची असून त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले . तसेच शाळेत अभ्यासक्रमासह विविध सहशालेय उपक्रम राबवित विद्यार्थ्यांचा विकास करावा असे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकासासह शारीरिक विकास होण्याकरिता लवकरच संगणकीय कक्षासह शाळेच्या पटांगणात ओपन जिम व विविध खेळाचे साहित्य लावण्यात येणार असल्याची माहिती दिली..!!!!
यावेळी ‘प्रवेशोत्सव’ सेल्फी पॉईंट वर इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या सर्वांचे छायाचित्रे काढून ती विद्यार्थ्यांच्या व कुटुंबियांच्या कायम स्मरणात राहावी यासाठी ते छायाचित्र कुटुंबियांना पाठविण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आशिष गोंडाने सर, किरण वाडीकर मॅडम,पराग भानारकर सर,सतीश जीवतोडे सर,भावना राऊत मॅडम, यांनी प्रयत्न केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहाय्यक शिक्षका आशा राजूरकर मॅडम यांनी केले…!

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close