ताज्या घडामोडी

श्री देवी अनुसया संस्थानास तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळूऊन देण्यासाठी पुढाकार घेऊ -सखाराम बोबडे पडेगावकर

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

परभणी जिल्ह्या भर नावलौकिक असलेल्या पिंपरी झोला येथील प्रसिद्ध अनुसया संस्थानास तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊ असे अभिवचन परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ यांनी पिंपरी येथे शनिवारी दिले.

शनिवारी सकाळी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ यांनी भागवत मात्रे यांच्या शेतातील वाकलेले विजेचे पोल व पडलेल्या तारा ची पाहणी केली. तत्पूर्वी अनुसया संस्थानाचे सचिव विठ्ठल भिसे पाटील यांच्या विनंतीवरून सखाराम बोबडे व सहकारी जयदेव मिसे यांनी अनुसया संस्थानास भेट देऊन दर्शन घेतले. सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. संस्थांनचे महाराज श्याम महाराज गिरी यांनी सखाराम बोबडे, जयदेव मिसे यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की अनुसया संस्थानाचा संपूर्ण जिल्हाभर नावलौकिक आहे .पण आपण आज पर्यंत या संस्थांनास तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी पुढाकार घेऊ शकलो नाहीत. तरी यापुढे गावकरी आणि संस्थांनाचे संचालक मंडळ व सर्व भक्तजन मिळून या संस्थानास तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊयात. या संस्थानाचा भक्त म्हणून मी या कामी पुढाकार घ्यायला तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. संस्थानात भक्ती निवास उभारणे ,गाई साठी गोठा उभारणी ही कामे प्राधान्याने करण्याचे गरजेचे असल्याचे संस्थानाचे सचिव विठ्ठल भिसे यांनी सांगितले. भागवत मात्रे सह गावकरी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close